ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Drugs Case | ‘अर्जुन रामपाल हाजीर होSSS’, ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून चौकशी!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2020 10:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Drugs Case | ‘अर्जुन रामपाल हाजीर होSSS’, ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून चौकशी!

शहर : मुंबई

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची आज (11 नोव्हेंबर) चौकशी (NCB Interrogate) होणार आहे. 9 नोव्हेंबरला अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता. या धाडीदरम्यान त्याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अवैध, बंदी घालण्यात आलेली औषधे जप्त करण्यात आली होती. यानंतर एनसीबीने अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रॅबिएला यांना चौकशी करता हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते.

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मैत्रिणीचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला नुकताच जामीन मिळाला आहे. परंतु, यानंतर एनसीबीला काही मोठे पुरावे मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला. आता या प्रकरणात बुधवारी (11 नोव्हेंबर) एनसीबी अर्जुन रामपालची चौकशी करण्यात येणार आहे.

एनसीबीची धडक कारवाई

सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकाला ताब्यात घेतल्याचे कळते आहे

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मेहुण्याचे नाव

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, आता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

बॉलिवूड निर्मात्याच्या घरात ड्रग्जचा साठा

रविवारी (8 नोव्हेंबर) सकाळी फिरोज यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली. तसेच, फिरोज यांनादेखील समन्स बजावण्यात आले. यानंतर ते एनसीबी कार्यालयात दाखल झाले होते.

एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरणेमध्ये अनेक ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीत 5 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली होती. यातीलच एका ड्रग्ज तस्कराने चौकशीदरम्यान एनसीबीला फिरोज नाडियाडवाला यांचे नाव सांगितले होते.

मागे

'कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात', मल्लिका शेरावतचं 2009 चं ट्विट व्हायरल
'कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात', मल्लिका शेरावतचं 2009 चं ट्विट व्हायरल

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बाय....

अधिक वाचा

पुढे  

अक्षय कुमारपेक्षा सिनेमाची खरी 'लक्ष्मी' - शरद केळकरांवर नेटिझन्स झाले फिदा
अक्षय कुमारपेक्षा सिनेमाची खरी 'लक्ष्मी' - शरद केळकरांवर नेटिझन्स झाले फिदा

बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट 9 नोव्हें....

Read more