ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाद करा पण आमचा कुठं?; ‘धुरळा’चं पहिलं गाणं पाहिलत का?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 07:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाद करा पण आमचा कुठं?; ‘धुरळा’चं पहिलं गाणं पाहिलत का?

शहर : मुंबई

          ‘धुरळा’ हा मल्टीस्टारर मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये वाजवण्यात आलेल्या पार्श्वसंगीताची प्रेक्षकांनी प्रचंड स्तुती केली होती. तेव्हापासूनच रसिकमंडळी ‘धुरळा’तील गाण्यांची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. सोशल मीडियावर सध्या या गाण्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे यूट्यूबवर १८ हजार पेक्षा अधिक वेळा नेटकऱ्यांनी पाहिले आहे.


           हव्वा कुनाची रं? … हव्वा आपलीच रं! असं म्हणत दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या ‘धुरळा’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ अशी मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते आहे.        

      
          गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सगळेच पैलू या ट्रेलरमध्ये उलगडण्यात आले आहेत. ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

मागे

'दबंग ३'ची पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई
'दबंग ३'ची पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई

           मुंबई - सलमान खानचा बहुप्रतीक्षीत 'दबंग ३' चित्रपट बॉक्स ऑ....

अधिक वाचा

पुढे  

या कलाकारांना दिला जाणार राष्ट्रीय पुरस्कार, इथे पाहा पूर्ण यादी
या कलाकारांना दिला जाणार राष्ट्रीय पुरस्कार, इथे पाहा पूर्ण यादी

           नवी दिल्ली- विज्ञान भवनात आज सोमवारी उपराष्ट्रपती वैंकय्या ....

Read more