ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संजय लीला भन्साळी करणार बालाकोट एअर स्ट्राइकवर चित्रपट

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संजय लीला भन्साळी करणार  बालाकोट एअर स्ट्राइकवर चित्रपट

शहर : देश

            निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पुलवामा येथे भारतीय जवानांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशवादी तळावर २६ फेब्रुवारी रोजी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हे दहशतवादी तळ उद्धवस्त झाले आणि अनेक दहशतवादी मारले गेले. 


         दरम्यान, या संदर्भातील माहिती प्रोडक्शन हाऊसच्या औपचारिक इन्स्टाग्राम पेजवरुन देण्यात आली आहे. भन्साळी प्रोडक्शनने दिलेल्या माहितीनुसार ‘संजय लीला भन्साळी, भूषण कुमार मनवीर जैन आणि प्रज्ञा कपूर हे संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मीत करणार आहेत. सतत लढण्याची आणि कधीही हार न मानणाऱ्या भारतमातेच्या पुत्रांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे,” असं म्हटलं आहे. 

 

           तसेच “या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिषेक कपूर करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भारतीय हवाई दलाचे यश साजरे करण्यासाठी केली जात आहे,” असंही भन्साळी प्रोडक्शनच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मागे

..आणि राणी मुखर्जी पोहचली मुंबई पोलीस कंट्रोल रूममध्ये
..आणि राणी मुखर्जी पोहचली मुंबई पोलीस कंट्रोल रूममध्ये

            मुंबई - बहुचर्चित 'मर्दानी २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्य....

अधिक वाचा

पुढे  

बाजीप्रभू देशपांडेंच्या अमर बलिदानाची गाथा रुपेरी पडद्यावर
बाजीप्रभू देशपांडेंच्या अमर बलिदानाची गाथा रुपेरी पडद्यावर

                  मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर यो....

Read more