ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...यामुळे नेटफ्लिक्सला सर्वांत मोठा फटका

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...यामुळे नेटफ्लिक्सला सर्वांत मोठा फटका

शहर : देश

          ‘नेटफ्लिक्स’ हे ऑनलाईन स्ट्रिमिंग क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय अॅहप म्हणून ओळखले जाते. जवळपास १५८.३ दशलक्ष सबस्क्राइबर्स असलेले ‘नेटफ्लिक्स’ ऑनलाईन मालिका आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी पहिल्या पसंतीचे अॅईप म्हणून ओळखले जाते. परंतु ऑनलाईन मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या या मक्तेदारीला छेद देण्यासाठी आता आणखी एक स्ट्रिमिंग अॅाप बाजारात उतरले आहे. द वॉल्ड डिस्ने कंपनीने सुरु केलेल्या या अॅजपचे नाव ‘डिस्ने प्लस’ असे आहे.


        ‘डिस्ने प्लस’ सुरु होताच त्यांनी नेटफ्लिक्सला धक्का देण्यास सुरुवात केली. पहिल्याच महिन्यात नेटफ्लिक्सचे तब्बल १.१ दशलक्ष (१ कोटी १० लाख) प्रेक्षक डिस्नेने आपल्या दिशेने खेचले. या मंडळींनी नेटफ्लिक्स अॅोप बंद करुन आता डिस्ने पाहण्यास सुरुवात केली आहे. न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार डिस्नेकडे सध्या १५ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. येत्या एक महिन्यात नेटफ्लिक्स पाहणारे आणखी २४ दशलक्ष ( २ कोटी ४० लाख ) प्रेक्षक डिस्ने प्लसच्या दिशेने वळणार आहेत. हा सर्व प्रकार सध्या अमेरिकेत सुरु आहे.


        द वॉल्ट डिस्ने ही जगातील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मिती कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. डिस्नेचे शेकडो ऑनलाईन शो याआधी नेटफ्लिक्सवर सुरु होते. परंतु आता त्यांनी स्वत:चे स्ट्रिमिंग अॅ प सुरु केल्यामुळे ते सर्व शो त्यांनी स्वत:च्या अॅवपवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. सर्वेनुसार नेटफ्लिक्सच्या एकूण प्रेक्षकांपैकी २४ टक्के प्रेक्षक डिस्नेचे शो पाहाणारा आहे. त्यामुळेच हा प्रेक्षक आता नेटफ्लिक्सपासून दुरावला आहे. येत्या काळात आणखी ६० दशलक्ष प्रेक्षक त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


 

मागे

'पंगा'च्या  प्रमोशनसाठी कंगनाचा नवा अवतार
'पंगा'च्या प्रमोशनसाठी कंगनाचा नवा अवतार

         प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय मिळवून देणारी तसेच ‘मणिकर्णि....

अधिक वाचा

पुढे  

'तान्हाजी'वर बंदी घातल्यावर निर्मात्याचं नुकसान होईल - अजय देवगण
'तान्हाजी'वर बंदी घातल्यावर निर्मात्याचं नुकसान होईल - अजय देवगण

          मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आपलं ....

Read more