ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कंगनाप्रमाणे पायल घोषला हवी वाय दर्जाची सुरक्षा, गृहमंत्र्यांकडे केली मागणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कंगनाप्रमाणे पायल घोषला हवी वाय दर्जाची सुरक्षा, गृहमंत्र्यांकडे केली मागणी

शहर : मुंबई

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्र लिहून आपला वकील आणि स्वत:साठी वाय दर्जाची सुरक्षा मागितली आहे. पायलचे वकील नितिन सातपुते यांनी सोमवारी आपल्या ट्विटरवरुन हे पत्र ट्विट केलं. आरोपी खुला फिरतोय, त्याला अद्यापही अटक केली नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

आरोपी मला नुकसान पोहोचवू शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वाटत असल्याचे पायल घोषने म्हटलंय. अनिल देशमुखांनी पायल घोष आणि नितीन सातपुतेंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी यात करण्यात आलीय.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पायलला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेतून पायलला न्याय मिळावा अशी मागणी करत खुद्द आठवलेंनीही अनुराग कश्यपवर तातडीनं कारवाई करण्याचाच सूर आळवला. असं न झाल्यास आपण धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत अपेक्षित कारवाई केली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा, या मागणीसह मंगळवारी पायल आणि रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आठवले यांनी या भेटीदरम्यानची काही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत त्याबाबतची माहिती दिली. 'महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज अभिनेत्री पायल घोषला न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळासह भेट घेतली', असं लिहित त्यांनी ही छायाचित्र पोस्ट केली.

अनुरागवर कारवाई करण्यात यावी अशी मागण जोर धरत असतानाच तिथं अनुरागनं मात्र आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच नव्हे, तर अनेक कलाकारांनी त्याची साथ देत या बॉलिवूड दिग्दर्शनाच्या समर्थनार्थ आवाज उठवल्याचं पाहायला मिळत आहे.

 

मागे

Sushant Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी
Sushant Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीत अखिल भारतीय आयु....

अधिक वाचा

पुढे  

Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग 'हे' नियम वाचाच
Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग 'हे' नियम वाचाच

केंद्र सरकारने Unlock 5 अंतर्गत देशातील चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली ....

Read more