ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पायल रोहतगीला न्यायालयीन कोठडी 

By Sudhir Shinde | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पायल रोहतगीला न्यायालयीन कोठडी 

शहर : मुंबई

         मुंबई – बॉलीवुड अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथून रविवारी सकाळी अटक केली. पायलला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अटक केली होती. स्वतः पायलने तिला अटक झाल्याचं ट्विटरवरून सांगितलं. तिच्या या ट्वीटनंतर अभिनेत्री कोयना मित्रा आणि दिग्दर्शिका रीमा कागती तिच्यासाठी उभ्या राहिल्या आहेत. पायलला पाठिंबा देत रिमा कागतीने ट्विटरवर लिहिले की, 'आतापर्यंत पायल रोहतगी जे बोलायची ते मला कधीच पटायचं नाही. मला ती मुर्ख वाटायची. पण लोकशाहीत एखाद्याला अशाप्रकारे अटक करणं योग्य नाही.'

          अभिनेत्री कोयना मित्रानेही पायलच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केले. कोयनाने लिहिले की, 'एका तासासाठी तू तुझं नाव हाफिज सईद ठेव. काँग्रेस सरकारला लाज वाटली पाहिजे.' पायलने पंतप्रधान ऑफिस आणि गृह मंत्रालयाला टॅग करून ट्वीट करत म्हटलं की, 'मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून अटक केली. मी जे बोलले ती सर्व माहिती गुगलवरून घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक थट्टा राहिली आहे.' अशी तिने प्रतिक्रिया केली. 

काय म्हणाली होती पायल रोहतगी ?
           'मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जो मला आत्ताच समजला. जेव्हा महाराज हरी सिंह यांनी शेख अब्दुल्ला यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं, तेव्हा त्यांचे वकील पंडित जवाहरलाल नेहरु होते, असं म्हटलं जातं. ही गोष्ट खरी आहे की खोटी? जर खरी असेल, तर जवाहरलाल नेहरु यांचं देशद्रोही वर्तन आता मला समजतं’ असे पायल रोहतगी हिने म्हटले होते.

 

मागे

'मर्दानी २' प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ३.८० कोटींची कमाई
'मर्दानी २' प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ३.८० कोटींची कमाई

मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जी चा 'मर्दानी २' चित्रपट १३ डिसेंबर रोजी रूपे....

अधिक वाचा

पुढे  

अरबाजमुळे मलायका उज्ज्वलामध्ये होतात भांडणं
अरबाजमुळे मलायका उज्ज्वलामध्ये होतात भांडणं

मुंबई - अभिनेत्री मलायका अरोरा व अरबाज खान दोन वर्षांपूर्वीच विभक्त झाले. पण....

Read more