ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘देश आई, तर शेतकरी बाप आहे’, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कलाकारही एकवटले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 10, 2021 09:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

‘देश आई, तर शेतकरी बाप आहे’, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कलाकारही एकवटले

शहर : देश

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि अनेक कलाकारांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिलाय. शनिवारी (9 जानेवारी) टीकरी बॉर्डरवर ‘आर्टिस्ट्स फॉर फार्मर्स हा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला. यात स्वरा भास्करसह हरभजन मान, जैसी बैंस, रब्बी शेरगिल आणि इतर अनेक पंजाबी गायक सहभागी झाले. याशिवाय कंवर ग्रेवाल, हर्फ चीमा, नूर चहल यांनी देखील कार्यक्रमात भाग घेतला. हा कार्यक्रम संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य मंचावर झाला.

शेतकऱ्यांसमोर बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, “मी येथे एक कलाकार म्हणून आले आहे. मी देशातील त्या नागरिकांचं प्रतिनिधीत्व करते जे शहरांमध्ये वाढले, मात्र कधी गावाकडे गेले नाही.’सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधातील लढा हा देशातील प्रत्येक नागरिकाचा लढा आहे. सर्वांची लढाई या आंदोलनाच्या माध्यमातून लढल्याबद्दल मी संपूर्ण देशाच्यावतीने आंदोलनकारी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानते. थोरामोठ्यांची सेवा करण्याऐवजी त्यांना कडाक्याच्या थंडीत बसण्यास भाग पाडलं जात आहे. आपला समाज आणि देश या स्थितीपर्यंत पोहचला आहे याची मला लाज वाटते.”

“आम्ही इतके निर्लज्ज आणि अहंकारी झालो आहोत की कडाक्याच्या थंडीत बसलेल्या या शेतकऱ्यांचा त्रास आम्हाला जाणवतही नाही. जर देश आपली आई असेल, तर शेतकरी आपला बाप आहे. कारण तो आम्हाला दोन वेळचं अन्न देतो. काही लोक आंदोलक शेतकऱ्यांविरोधात चुकीचे आरोप करत आहेत. ते दररोज शिव्याशाप देत आहेत आणि नागरिकांना शेतकऱ्यांविरोधात भडकावत आहेत. त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांची माफी मागते,” असंही स्वरा भास्करने नमूद केलं.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी 26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या विविध सीमांवर अगदी कडाक्याच्या थंडीतही आंदोलन करत आहेत. हे कायदे रद्द करावेत हीच त्यांची मुख्य मागणी आहे.

आपण ही लढाई देखील जिंकू

नूर चहल म्हणाली, ‘मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. आपला इतिहास आपल्याला हेच सांगतो की याआधीही आपण अनेक लढाया जिंकल्या आहेत आणि ही लढाई देखील आपण जिंकू हा मला विश्वास आहे.’ विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जवळपास सर्व पंजाबी गायकांनी पाठिंबा दिलाय. कंवर ग्रेवाल आणि चीमा सुरुवातीपासून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

मागे

माझं शोषण होत आहे, kangana Ranaut ने व्हिडिओ केला शेअर
माझं शोषण होत आहे, kangana Ranaut ने व्हिडिओ केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने बहिण रंगोलीसोबत आज वांद्रे पोलीस स्टेश....

अधिक वाचा

पुढे  

Good News! बजेट आधीच ‘या’ राज्य सरकारने रद्द केला करमणूक कर, सिनेसृष्टीत आनंद
Good News! बजेट आधीच ‘या’ राज्य सरकारने रद्द केला करमणूक कर, सिनेसृष्टीत आनंद

देशातल्या एका सरकारने राज्यातील सिनेसृष्टीला मदत करण्यासाठी मोठे निर्णय ....

Read more