ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'छपाक'च्या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 03:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'छपाक'च्या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

शहर : मुंबई

           मुंबई - काही व्यक्तींच्या सोबत असण्यानेही बऱ्याच असाध्य गोष्टीसुद्धा सुकर वाटू लागतात. ही भावना असते प्रेमाची, आपलेपणाची, हक्काची आणि एखाद्याप्रती असणाऱ्या विश्वासाची, एखाद्यासाठीच्या ओढीची. याच सर्व भावना एकवटत 'छपाक' चित्रपटातील ‘नोक-झोक’ पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

           दीपिकाने साकारलेली 'मालती' या गाण्यातून आणखी उलगडत जाते, यामध्ये तिला साथ मिळते ती म्हणजे विक्रांतची. मेघना गुलजार दिग्दर्शित हे गाणं म्हणजे जणू अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि न्यायासाठी लढणाऱ्या मालतीच्या जीवनातील एका सुरेख भावनेचा बहर. आता ही भावना प्रेमाची आहे की, सकारात्मकतेची ही चित्रपटातूनच अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट होणार आहे. 


          शंकर-एहसान-लॉय या संगीतकार त्रिकूटाने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी लिहिले आहेत. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनात साकारलेला चित्रपटात बी- टाऊनमधील लोकप्रिय संगीतकारांचं संगीत आणि गीतकार गुलजार यांच्या शब्दांनी बहरलेली गीतं म्हणजे प्रेक्षकांसाठी जणू पर्वणी. 


        अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करत तितक्याच परिणामकारकपणे 'छपाक' हा चित्रपट साकारण्यात आला आहे. १० जानेवारी २०२०ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनातील काही प्रसंगांवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, ज्यानंतर या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
 

मागे

...म्हणून उर्दू लेखक मुजतबा हुसैन पद्मश्री परत करणार
...म्हणून उर्दू लेखक मुजतबा हुसैन पद्मश्री परत करणार

           “देशात अशांतता, भितीचं वातावरण निर्माण केलं जात असून द्वे....

अधिक वाचा

पुढे  

मुलीच्या निधनानंतर मौसमी चटर्जी यांचा जावयावर गंभीर आरोप
मुलीच्या निधनानंतर मौसमी चटर्जी यांचा जावयावर गंभीर आरोप

           मुंबई - 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्....

Read more