ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

गर्जा हिंदुस्तान गणेशोत्सव स्पर्धा २०१९

अटी व कार्यक्रमाचा तपशील:

 • 'सार्वजनिक / घरगुती गणेशोत्सव स्पर्धा-२०१९' मध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी दिनांक २ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०१९ पर्यंत करता येईल (रात्री १२:००पर्यंत).
 • सर्व स्पर्धकांनी गणपतीचे फोटो, अपलोड करताना त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता,ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर समाविष्ट करणे आवश्यक आहे.
 • स्पर्धकाने आपल्या गणपतीचे वेगवेगळ्या प्रकारची ५ छायाचित्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
 • तसेच आपल्या घरगुती /सार्वजनिक गणपतीची आणि मंडळाची पूर्ण माहिती द्यावी लागेल.
 • छायाचित्रे केवळ जेपीईजी (JPEG), आणि पीएनजी (PNG) स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. छायाचित्राचा आकार 1 एमबी(MB)पेक्षा जास्त नसावा.
 • नोंदणी पूर्ण झाल्यावर आपल्या मोबाइलवर आपला आयडी व एक लिंक पाठवली जाईल . त्या लिंकव्द्दारे आपण आपल्या गणपतीसाठी जास्तीत जास्त वोटिंग मिळवू शकता.
 • विजेत्यांच्या निवडीचा निर्णय परीक्षकांच्या अधीन असेल.
 • छायाचित्रातील मूर्तीच्या सजावटीच्या आधारे 3 लकी विजेत्यांची निवड परीक्षक करतील.
 • 'घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०१९' च्या विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व मानचिन्ह देण्यात येईल.
 • 'सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०१९' च्या विजेत्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील.
 • अधिकाधिक वोटिंग मिळालेल्या सार्वजनिक / घरगुती गणपतीला विशेष बक्षीस दिले जाईल.
 • 'सार्वजनिक / घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०१९' मध्ये सहभाग घेणार्‍यांना सर्व सहभागीना प्रमाणपत्र देण्यात येईल.
 • सर्वोत्कृष्ट विजेता निवडीचा परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल.
 • निवड झालेल्या विजेत्यांनी नोंदणीच्या वेळी कोणतीही चुकीची माहिती दिली असेल किंवा सर्व संबंधित माहिती दिली नसेल किंवा निवासी संवादाचा पत्ता भारताबाहेर असेल तर अशा परिस्थितीत त्याची निवड रद्द केली जाईल आणि नवीन विजेता परीक्षक मंडळाव्द्दारे निवडला जाईल.
 • विजेते घोषित होण्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत बक्षिसे विजेत्या स्पर्धकांना देण्यात येतील.
 • बक्षीस वितरित झाल्यानंतर बक्षिसांबद्दल कोणताही दावा अथवा तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
 • स्पर्धेबाबतीतील कोणतेही बदल करण्याचे सर्वाधिकार आयोजकांकडे राहतील. त्याबाबत इतर दावे अथवा तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत.
 • गर्जा हिंदुस्तानचे कर्मचारी व नातेवाईकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
 • कोणत्याही शंका निरसनासाठी garjahindustan@gmail.com वर संपर्क करता येईल.

येथे माहिती व छायाचित्रे अपलोड करा<

प्रकार:

घरगुती
सार्वजनिक

Note: Min 3 photo mandatory