ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींचे पार्थिव भाजप मुख्यालयात; अडीच वाजता अंत्यसंस्कार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2019 11:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींचे पार्थिव भाजप मुख्यालयात; अडीच वाजता अंत्यसंस्कार

शहर : देश

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. आज त्यांच्यावर निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काल जेटली यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून कैलाश कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी जेटलींचे अंत्यदर्शन घेतले. 

काहीवेळापूर्वीच त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणण्यात आले. याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य लोकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. यानंतर निगम बोध घाटापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. दुपारी साधारण दोनच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

भाजपमधील संयमी आणि बुद्धिमान नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि सर्वपक्षीय संबंध असणारा नेता म्हणून जेटली यांची ओळख होती. दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात जेटलींना विशेष मान होता. 

मागे

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींना आज अखेरचा निरोप
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींना आज अखेरचा निरोप

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स ....

अधिक वाचा

पुढे  

रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट,3 गोविंदाचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट,3 गोविंदाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी फोडल्यानंतर खा....

Read more