ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई पोलिसांच्या आठ तास डयुटीला 3 वर्षे पूर्ण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई पोलिसांच्या आठ तास डयुटीला 3 वर्षे पूर्ण

शहर : मुंबई

12 हून अधिक तास कराव्या लागणार्‍या कामाला ब्रेक लावत पोलीस अंमलदारांच्या सुरू झालेल्या आठ तास डयुटीला यशस्वी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. काही पोलीस ठाणी वगळता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आठ तास डयुटीचे काम सुरळीत सुरू आहे.
पोलिसांचे कामाचे तास, त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम यामुळे पोलिसांची डयुटी आठ तासांची करा, अशी आग्रही मागणी पोलीस कुटुंबीयांची होती. या मागणीची गंभीर दखल घेत तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर देवनार, चेंबूर या पोलीस ठाण्यांत आठ तास डयुटीला सुरुवात केली. अंमलदार रवींद्र पाटील यांनी तयार केलेल्या अचूक आराखडयानुसार गणेशोत्सव व बकरा मंडी हे एकाच वेळेला असतानाही तेथे आठ तास डयुटी यशस्वी पार पडली. त्यामुळे आयुक्तांनी हळूहळू विविध पोलीस ठाण्यांत आठ तासांची डयुटी सुरू केली. 94 पैकी 91 पोलीस ठाण्यांत आज आठ तासांची डयुटी सुरू असून त्याला रविवारी तीन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या आठ तास डयुटीतून प्रेरित होऊन रेल्वे पोलीस दलातही आठ तास डयुटी सुरू करण्यात येणार आहे.

मागे

ब्रिटनच्या शाही घराण्यात आला नवा राजपुत्र
ब्रिटनच्या शाही घराण्यात आला नवा राजपुत्र

प्रिन्स हॅरीची पत्नी डचेज ऑफ ससेक्स मेगन मर्केल हिला मुलगा झाला आहे. सोमवार....

अधिक वाचा

पुढे  

भाटघर धरणात पांडव कालीन शिवमंदिराचे दर्शन 
भाटघर धरणात पांडव कालीन शिवमंदिराचे दर्शन 

भाटघर धरणातून सातत्याने होणार्‍या विसर्गामुळे धरणातील पाणी झपाट्याने कम....

Read more