ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधून कोरोनाचे चार संशयित रुग्ण पळाले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 14, 2020 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधून कोरोनाचे चार संशयित रुग्ण पळाले

शहर : नागपूर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयातून शनिवारी कोरोनाच्या चार संशयित रुग्णांनी पळ काढला आहे. त्यामुळे आता हे रुग्ण शहरातील इतर लोकांच्या संपर्कात आल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, यापैकी तिघांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे या वॉर्डात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने या रुग्णांचा शोध सुरु केला. कालच संध्याकाळी या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एकाची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. तर उर्वरित चौघांचे रिपोर्ट आज उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान, पोलिसांना हे चार जण आपापल्या घरी आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्यांना शनिवारी रुग्णालयात पुन्हा परतण्याची विनंती केली. हे सर्वजण स्वच्छतागृहाला जाण्याच्या बहाण्याने एकापाठोपाठ एक रुग्णालयातून बाहेर पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या चारपैकी तीन रुग्ण नागपुरातील आहेत तर एक रुग्ण चंद्रपूरचा आहेया पाच संशयितांमध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या घरी ही महिला काम करत होती. तर संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि सहकाऱ्याची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आल्याचे समजते. मात्र, या तिघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

मागे

कोरोनामुळे  ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
कोरोनामुळे ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पा....

अधिक वाचा

पुढे  

भारतातील कोरानाचे 10 रूग्ण ठणठणीत बरे
भारतातील कोरानाचे 10 रूग्ण ठणठणीत बरे

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अमेरिकेत तर कोरोनामुळे राष्ट्रीय ....

Read more