ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपुरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2020 10:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपुरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत

शहर : नागपूर

नागपूर शहरातील बससेवा साडेचार महिन्यांपासून बंद आहेत. बसेस बंद असल्यामुळे 50 टक्के बसेसचे टायर खराब झाले आहेत. बसेस बंद असल्याने शेकडो बसेसच्या बॅटऱ्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे मोठं नुकसान बसेसचे झालं आहे. शहरातील अनेक स्टार बसेस भंगारात जाण्याच्या स्थितीत आहेत.

साडेचार महिन्यांपासून बसेस एकाच ठिकाणी उभ्या असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीने स्टार बससेवा बंद आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका नागपुरातील बस सेवेला बसला आहे.

लॉकडाऊनमुळे बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुणे महानगर परिवहन मंडळावरही आर्थिक संकट आले आहे. लॉकडाऊनमुळे पीएमपीएमएल बस सेवेला 100 कोटींचे नुकसान झाले आहे. पीएमपीएमएलची सेवा सलग 67 दिवस बंद होती. त्यामुळे हे नकुसान झाले आहे.

पीएमपीएमएलचे दररोजचे सरासरी उत्पन्न एक कोटी 60 लाखांपर्यंत होते. तर दरमहा 45 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पण 17 मार्चपासून पीएमपीएमएल सेवा बंद असल्यामुळे पीएमपीएमएल विभागाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील फक्त 100 बसेस सुरु आहेत.

पुणे, पिंपरीत 3 सप्टेंबरपासून बससेवा सुरु होणार असल्याचे माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ य़ांनी दिली. बसे सेवा सुरु होणार असल्याने नागरिकांना प्रवासासाठी दिलासा मिळणार आहे.नुकतेच वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात डफली बजाव आंदोलन करण्यात आले. राज्यातील बसेस सुरु कराव्यात तसेच लॉकडाऊन उठवण्याबाबत हे आंदोलन करण्यात आले होते.

मागे

तुकाराम मुंढे यांच्या गेल्या १५ वर्षात १५ बदल्या
तुकाराम मुंढे यांच्या गेल्या १५ वर्षात १५ बदल्या

राज्यातील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम म....

अधिक वाचा

पुढे  

'...तर मुंबईतल्या लोकल ट्रेन सुरू करू', मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण
'...तर मुंबईतल्या लोकल ट्रेन सुरू करू', मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण

मुंबई लोकल कधीही सुरू करण्याची आपली तयारी आहे, मात्र राज्य सरकारच्या निर्ण....

Read more