ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑनलाइन खरेदी करणारे ५६.१% भारतीय सवलतीशी संबंधित फसवणुकीच्या जाळ्यात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑनलाइन खरेदी करणारे ५६.१% भारतीय सवलतीशी संबंधित फसवणुकीच्या जाळ्यात

शहर : देश

एकावर एक मोफत, एक वस्तू खरेदी करा दुसऱ्यावर ३० टक्के सूट मिळावा... या अशा काही वाक्यांची भारतीय ग्राहकांना भुरळ पडते. वेळेनुरूप सवलतीची इच्छा ग्राहकांची कमजोरी बनत असल्याचे सांगितले जाते. या कमकुवतपणामुळे बऱ्याचदा फसवणुकीच्या जाळ्यातही ते ओढले जातात. ऑनलाइन जगतात फसवणुकीची शक्यता आणखी जास्त होते. सायबर सिक्युरिटी कंपनी मॅकएफीच्या अहवालानुसार, ५६.% भारतीय ऑनलाइन खरेदीच्या वेळी सवलतीशी संबंधित फसवणुकीचे बळी ठरतात. सूट प्राप्त करण्याच्या नादात ग्राहक अनेकदा अशी लिंक क्लिक करतात, जी संशयास्पद वेबसाइट किंवा अॅपवर घेऊन जाते. तिथे त्यांनी खरेदी केल्यास त्यांची फसवणूक होते. सवलतीशिवाय ऑनलाइन राहणारे भारतीय बनावट धर्मादाय संस्थांच्या जाळ्यात ओढले जातात. अशा प्रकरणात घोटाळेबाज स्वत:ला खऱ्या ट्रस्टशी संबंधित असल्याचे आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे दाखवत चुना लावतात. मॅकएफीनुसार, ऑनलाइन फसवणुकीस बळी पडलेल्यांमध्ये ६०.% लोक बनावट धर्मादाय संस्थेत अडकतात. मॅकएफीने अशा प्रकारच्या फसवणुकीची माहिती देण्यासाठी ख्रिसमस कॅरोल : स्कॅम एडिशन नावाने अहवाल जारी केला आहे. भारतीय सर्वसाधारणपणे फसव्या अॅपचे शिकार होतात. अहवालानुसार, सायबर गुन्हेगार सतत तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहेत. मात्र, -मेल फिशिंग आणि टेक्स्ट फिशिंगसारख्या जुन्या पद्धतींमुळे आताही जवळपास २५% भारतीय फसले जातात. नवी पिढी टेक्नो सॅव्ही म्हटली जाते, मात्र असे असतानाही ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांत सतत वाढ होत आहे. ३५.% भारतीयांनी डिस्काउंटच्या जाळ्यात फसल्याचे मान्य केले. असे संशयास्पद अॅप सर्वसाधारणपणे युजरच्या डिव्हाइसमध्ये आपली फाइल अपलोड करतात.

सणासुदीत ६०.% ग्राहक रोबो कॉलिंगला बळी पडतात. दुसरीकडे, ५७.% ग्राहक सिम जॅकिंगचे शिकार ठरतात. कौटुंबिक सहल आणि प्रवास बहुतांश लोकांच्या अजेंड्यावर असतो.

गिफ्ट कार्डद्वारे वैयक्तिक माहिती

गिफ्ट कार्डच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा ट्रेंड समाेर आला आहे. ३९.% ग्राहकांना गिफ्ट कार्डद्वारे बनावट वेबसाइटपर्यंत नेले जाते. तिथे त्यांचे नाव, दूरध्वनी क्रमांक, क्रेडिट कार्डसारखी वैयक्तिक माहिती भरून घेतली जाते. अहवालानुसार, फसवणुकीतील बळी पडलेल्या ४०% लोकांनी १० हजार ते १५ हजार रुपये गमावले. तरुणाईही ऑनलाइन फसवणुकीपासून दूर नाही. १८ ते २४ वर्षांचे ५२.% युवा रोमान्स स्कॅमचे शिकार ठरतात.

मागे

सोलापुरात कांद्याला साडेदहा हजारांचा उच्चांकी दर
सोलापुरात कांद्याला साडेदहा हजारांचा उच्चांकी दर

           सोलापूर- कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सु....

अधिक वाचा

पुढे  

जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम

जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम गेल्या महिन्यात भारताच्या परदेशी व्यापारावरह....

Read more