ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर वर्षभरात एकूण ९२ अपघाती मृत्यू

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 12:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर वर्षभरात एकूण ९२ अपघाती मृत्यू

शहर : मुंबई

       मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर विख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांच्या वाहनाला झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा हा मार्ग चर्चेत आला आहे. जानेवारी ते डिसेंबर, २०१९ या कालावधीत या एक्स्प्रेस महामार्गवर ७४ अपघातांमध्ये ९२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वर्षभरातील अपघातांची एकूण संख्या ३०६ वर पोहचली आहे. 


       सर्वाधिक अपघात रायगड विभागात झाले असून, मृतांची संख्याही याच विभागात अधिक आहे. एकूण अपघातांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. प्राणघातक अपघातांमध्ये ७० पुरुष तर २२ महिलांचा मृत्यू ओढवला आहे. गंभीर जखमींमध्ये १२४ पुरुष व ३८ महिला, किरकोळ जखमींमध्ये २८ पुरुष व ३ महिला अशी संख्या आहे. अपघात होऊनही दुखापत न झालेल्या प्रवाशांची संख्या १३८ आहे. रायगडनंतर पुणे, नवी मुंबई व त्यानंतर पिंपरी-चिंचवड विभागात अधिक अपघात झाले आहेत. 


      मात्र, मागील काही वर्षांची तुलना केल्यास एक्स्प्रेस वेवरील अपघातांचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. अपघातांचे प्रमाण कमी व्हावेत म्हणून हायवे पोलिस विविध उपाययोजना राबवत आहेत. अपघातांचे प्रमाण आणखी कमी व्हावे म्हणून येत्या काही दिवसांत राज्य सरकार आणखी काही उपाय योजणा करणार असल्याचे समजते.


अपघात / मृत्यू / गंभीर जखमी / एकूण अपघात 
नवी मुंबई            - ११ /११ /२४ /२४
रायगड               - ३३ /४५ /७५ /२२०
पुणे ग्रामीण          - २५ /३० /३० /४७
पिंपरी चिंचवड     - ५ ६ /३३ /१५
एकूण                - ७४ /९२ /१६२ /३०६

 

मागे

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती

           मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती स....

अधिक वाचा

पुढे  

शाळांमध्ये संविधान वाचन बंधनकारक
शाळांमध्ये संविधान वाचन बंधनकारक

   मुंबई - 'वी द पीपल...आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्....

Read more