ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर मुळ सदनिकाधारकांना मोफत घर देताना त्यावर जीएसटी नको’ - वित्तमंत्री

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर मुळ सदनिकाधारकांना मोफत घर देताना त्यावर जीएसटी नको’ - वित्तमंत्री

शहर : मुंबई

इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर मुळ सदनिकाधारकांना मोफत घर बांधून देतांना त्यावर जीएसटी आकारू नयेहे फ्लॅट वगळता उर्वरित विक्री होणाऱ्या फ्लॅटवर जीएसटी आकारला जावा हा विषय येत्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आज बृहन्मुंबई डेव्हलपर्स असोसिएशन ने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

हा विषय इतर राज्यांसाठी नसला तरी महाराष्ट्रासाठी आणि विशेषत: मुंबईसाठी महत्वाचा आहे. मुंबईत एसआरएम्हाडासेस आणि इतर इमारतींच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मोठा आहे. या कामाला गती मिळावी यादृष्टीने ज्या इमारतींचे रिडेव्हलपमेंट होत आहे तेथील मुळ सदनिकाधारकांना पुनर्बांधणीनंतर नवीन घर मोफत देताना त्यावर जीएसटी आकारू नयेपुनर्बांधणीत मुळ सदनिकाधारकांचे फ्लॅट मोफत देऊन झाल्यानंतर जे फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध राहतील त्या उर्वरित नव्या फ्लॅटच्या विक्रीवर जीएसटी आकारावा ही मागणी आपण वस्तू आणि सेवा कर परिषदेमध्ये मांडू, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

इमारतीच्या रिडेव्हलपमेंटनंतर मोफत घर बांधून दिल्यानंतरही त्या घरावर जीएसटी आकारला जात असल्याने इमारतींच्या पुनर्विकासाची कामे खोळंबली असल्याचे मत बिल्डर असोसिएशनच्या वतीने बैठकीत व्यक्त करण्यात आले.

 

मागे

श्रीनगर मध्ये 24 दहशतवादी घुसले
श्रीनगर मध्ये 24 दहशतवादी घुसले

श्रीनगरमध्ये घुसलेले 24 दहशतवादी परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्य....

अधिक वाचा

पुढे  

ऑगस्ट 2019 मधील घाऊक किंमत निर्देशांक
ऑगस्ट 2019 मधील घाऊक किंमत निर्देशांक

ऑगस्ट 2019 मध्ये सर्व वस्तूंसाठीचा घाऊक किंमत निर्देशांक 0.2 टक्के वाढून तो 121.4 (त....

Read more