ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Farmers Protest : आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत प्रवेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2020 10:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Farmers Protest : आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत प्रवेश

शहर : देश

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Agricultural law) शेतकऱ्यांनी आंदोलन ( Farmers Protest) सुरु केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी  (farmers) आक्रमक झालेत. पंजाब, हरियाणा या राज्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी  (farmer) दिल्लीकडे रवाना झाले होते. त्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आले. पोलिसांकडून  (Police) आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत अश्रुधुराचा वापर केला. मात्र, शेतकरी झुकले नाहीत. त्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले. अखेर पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला आहे

farmers prortest police used water canon on protestors

अखेर दिल्लीच्या पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाला परवानगी दिलीय. तसचं निरंकारी समागम मैदानात आंदोलनाची परवानगी ही दिली. मात्र दिल्लीत इतरत्र कुठेही शेतकऱ्यांना आंदोलन करता येणार नाही असं ही पोलिसांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत जाऊन आंदोलन करण्यासाठी पंजाब हरियाणामधून मोठ्या संख्येनं शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते.

farmers protest heavy police force deployment at delhi faridabad border

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी कृषी कायद्याला विरोध करत आहेत. आपले आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी चलो दिल्लीचा नारा शेतकऱ्यांनी दिला. मात्र, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यात आले होते. प्रचंड पोलीस फौजफाटा महार्गावर तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला.

farmers prortest police used water canon on protestors

मात्र, शेतकरी कावाईला दाद दिली नाही. पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचा वापर केला. मात्र, शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दिल्लीत प्रवेश दिला नाही तर येथेच ठान मांडून राहण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यानंतर दिल्लीत शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने धडक मारली. केंद्र सरकारच्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकारलाही नमते घ्यावे लागले आहे.

 

मागे

Coronavirus च्या पार्श्वभूमीवर महिलांच्या लोकल प्रवासाबद्दल पुन्हा मोठा निर्णय़
Coronavirus च्या पार्श्वभूमीवर महिलांच्या लोकल प्रवासाबद्दल पुन्हा मोठा निर्णय़

कोरोना व्हायरसचा Coronavirus वाढता प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर आता आणखी ....

अधिक वाचा

पुढे  

'अर्णब गोस्वामींना जामीन न देणं ही उच्च न्यायालयाची चूक'
'अर्णब गोस्वामींना जामीन न देणं ही उच्च न्यायालयाची चूक'

इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम नाईक यांच्या आत्महत्ये ....

Read more