ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Airtel ने घेतला मोठा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 04:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Airtel ने घेतला मोठा निर्णय

शहर : मुंबई

टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानं रिचार्ज महागले होते. रिलायन्स जिओनं 40 टक्के तर व्होडाफोन आयडिया, एअरटेल या कंपन्यांनी 50 टक्क्यांची वाढ केली होती. यामुळे 100 रुपयांचा रिचार्ज 140 ते 150 रुपये इतका झाला. यातही फक्त आपल्याच नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल आणि इतर नेटवर्कसाठी एक्स्ट्रा चार्जेस आकरण्याचा निर्णयही कंपन्यांनी घेतला होता. यामुळे ग्राहकांनी काळजी व्यक्त केली होती.आता एअरटेलनं ग्राहकांच्या तक्रारी आणि नाराजी समजून घेतली असून फेअर युसेज पॉलिसी बंद करण्याचा निर्णय़ घेतला आहे. कंपनीने इतर नेटवर्कवरसलुद्धा अनलिमिटेड कॉल देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कंपनीने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. यात एअरटेलनं म्हटलं की, आम्ही तुमचं म्हणणं ऐकलं आणि आता बदल करतोय. उद्यापासून इतर नेटवर्कवर अनलिमीटेड प्लॅन पुन्हा पुर्ववत सुरू होतील. अनलिमिटेड कॉल्सचा आनंद घ्या. यासाठी कोणत्याही अटी नाहीत असंही एअरटेलनं नमूद केलं आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफ चार्जमध्ये 50 टक्के वाढ करण्याचे जाहीर केलं आहे. यात व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे. एअरटेलनं प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 रुपये इतकी दरवाढ केली आहे. यामध्ये आता त्यांनी डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा देण्यात येतील असं म्हटलं होतं. तसेच मर्यादित कॉल संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे अधिक मोजावे लागतील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती.

मागे

आम्ही स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला; हैदराबाद पोलिसांचे स्पष्टीकरण
आम्ही स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला; हैदराबाद पोलिसांचे स्पष्टीकरण

हैदराबाद हत्याकांडानंतर सायबराबाद पोलीसांकडून चारही आरोपींचं एन्काऊंटर ....

अधिक वाचा

पुढे  

2020मध्ये असणार इतक्या सुट्ट्या, प्लॅन करण्याआधी पाहा लिस्ट
2020मध्ये असणार इतक्या सुट्ट्या, प्लॅन करण्याआधी पाहा लिस्ट

येत्या काही दिवसातच 2019 वर्ष संपणार आहे. 2020च्या स्वागताची तयारी देखील सुरु के....

Read more