ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पोहायला गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2020 09:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पोहायला गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

शहर : औरंगाबाद

औरंगाबादमध्ये दोन चुलत बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन चुलत बहिणी या पोहोण्यासाठी गेल्या होत्या, पण त्यानंतर त्यांच्या मृत्यू बातमी आल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दोघीही तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील खामगावात ही घटना घडली आहे. ऋतुजा कवडे आणि आरती कवडे अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत. खरंतर, कोरोनाच्या संकटात गेले अनेक महिने कोणीही घराबाहेर पडलं नाही. त्यामुळे गावात तरुण-तरुणांची अशी मज्जा सुरूच असते. पण दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या बहिणींना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यात तलाव तुंडूब भरलं होतं. त्यामुळे खोलीकरनामुळे त्यांना पोहता आलं नाही आणि अशात बुडून दोघींचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचेही मृतदेह बाहेर काढले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि आरतीचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घरातल्या हसत्या-खेळत्या मुलींचा असा अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मागे

वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता - ऊर्जामंत्री नितीन राऊत
वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता - ऊर्जामंत्री नितीन राऊत

अचानक मुंबई आणि उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याप्रकरणी राज्याचे ऊर्जामंत....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यासह राज्यात पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
पुण्यासह राज्यात पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे दे....

Read more