ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्या में राम आयेंगे… दारू, चिकन, मटण शॉप बंद ठेवा, पुणेकरांची मागणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 09:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

 अयोध्या में राम आयेंगे… दारू, चिकन, मटण शॉप बंद ठेवा, पुणेकरांची मागणी

शहर : देश

22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी पुणेकरही सज्ज झाले आहेत. 22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे. हा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार असून यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशातही दिसत असून पुणेकरही यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. 22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. संघर्ष सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली आहे.

22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा उत्सव देशभर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 तारखेला देशामध्ये उत्साहाचं, आनंदी वातावरण रहावं. यामुळे सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासेविक्री दुकानं एका दिवसासाठी बंद ठेवावी अशी मागणी संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा अधिकारी, पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुण्यातून अयोध्येसाठी 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या

पुण्यातून अयोध्येसाठी 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्येसाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी भक्तांकडून केली जात होती, त्यानुसार रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने पुण्यातून 30 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात 15 विशेष रेल्वे अयोध्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहेत.

मागे

मनोज जरंगे यांच्या आंदोलनाबाबत अंतिम तोडगा, अधिसूचना निघणार
मनोज जरंगे यांच्या आंदोलनाबाबत अंतिम तोडगा, अधिसूचना निघणार

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदो....

अधिक वाचा

पुढे  

म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी
म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी

हक्काच्या घराच्या शोधात तुम्हीही आहात का? म्हाडा तुम्हाला देतंय ही संधी. वा....

Read more