ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेला 23 कोटींचा गंडा

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेला 23 कोटींचा गंडा

शहर : सांगली

बँक ऑफ बडोदाच्या सांगलीच्या शाखेला कोलड स्टोरेज मालकांनी 23 कोटी रूपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बँकेने सांगली शहर पोलिस ठाण्यात 10 जणाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपस करीत आहेत.

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की शेतकर्‍यांनी हळद आणि बेदाणा तारण ठेऊन कर्ज घेतले. तथापि, सांगलीतील सहा कोल्ड स्टोअरेज मध्ये ठेवलेली हळद व बेदाणा मालकांनी परस्पर विकल्याचे दिसून आले. त्यामुळे बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेला 23 कोटी 12 लाख 14 हजार रुपयांचे नुकसान झाले.

मुंबईतील सीएनएक्स कोरपोरेशन कंपनीच्या  मुख्य कार्यंकरी अधिकारी निरूपमा पेंडुरकर, त्याच कंपनीचे पश्चिम विभागाचे प्रमुख अजित जाधव, यांच्यासह साई एग्रोटेक स्टोअरेज व राधाकृष्ण स्टोरेजचे दीपक गौरव, कवठे एकंद लक्ष्मी एग्रो कोल्ड स्टोअरेज संचालक आणि भागीदार पवनकुमार चौगुले, जयपाल शिरगवे, लखमगौडा पाटील रूपाली शेंड्बाळे, अभ्युदया कोल्ड स्टोअरेजचे प्रदूम्न पाटील, बिएल कोल्ड स्टोरेजचे राहुल मित्तल, गोमटेश कोल्ड स्टोअरेजचे अनिल सुगन्नावर अशी गुन्हा दाखल झाले त्यांची नावे आहेत.

पुढे  

एअर इडियाचे खाजगीकरण होणार
एअर इडियाचे खाजगीकरण होणार

आर्थिक अडचणीमुळे डबघाईस आलेल्या जेट एअरवेज ची सेवा ठप्प झालेली असतानाचा आत....

Read more