ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बँक कर्मचार्‍याचा 2 दिवसांचा संप मागे

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बँक कर्मचार्‍याचा 2 दिवसांचा संप मागे

शहर : मुंबई

केंद्र सरकारने राष्ट्रीय बँकाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात व बँक कर्मचार्‍यांच्या इतर मागण्यासाठी 4 बँक अधिकारी  संघटनांनी येत्या 26 व 27 सप्टेंबर रोजी संप पुकारला होता. तथापि, बँक संघटनाच्या चर्चा झाल्यामुळे हा नियोजित संप मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 10 बँकाचे 4 बँकामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 26 व 27 सप्टेंबर आणि पुढे चौथा शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने सलग चार दिवस बँका संपामुळे बंद राहणार होत्या. त्यामुळे ग्राहकांची मोठी पंचाईत होणार होती.  मात्र आता बँका सुरू राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

 

 

मागे

6 महिन्यासाठी पीएमसी बँकेवर निर्बंध
6 महिन्यासाठी पीएमसी बँकेवर निर्बंध

मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंड....

अधिक वाचा

पुढे  

उद्योगांना कमी कार्बन उत्सर्जन प्रकारात वळवण्याची घोषणा
उद्योगांना कमी कार्बन उत्सर्जन प्रकारात वळवण्याची घोषणा

जगभरातल्या सर्वाधिक हरित वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना कमी कार्बन अर....

Read more