ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बँकांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात येणार : बँकेतील काम लवकरात लवकर उरका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 05:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बँकांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात येणार : बँकेतील काम लवकरात लवकर उरका

शहर : मुंबई

कोरोना व्हायरसमुळे देशातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. देशातील अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. कोलमडणारी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आणि देशातील कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून लवकरच मोठी पावलं उचलली जाणार आहेत. लवकरच बँकांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात येणार आहे म्हणजेच सामान्यांसाठी बँकेची वेळ कमी करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे कोरोनामुळे प्रभावित क्षेत्रांसाठी NPA चे नियम व अटी शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. याकरता 30 ते 60 दिवसांचा कालावधी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

आणि सरकारमध्ये चर्चा सुरु आहे.

अर्थ मंत्रालयाने बँकांना Business Continuity Plan बनवण्यास सांगितले आहे. अधिक महत्त्वाच्या कामांसाठी बँकांची वेगवेगळी टीम बनवण्यात येऊ शकते. कामकाजाची वेळ मुख्यत: कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे NPA मध्ये शिथिलता मिळण्याबाबत अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग डिपार्टमेंटने (bank time) प्रस्ताव मांडला आहे. अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यामध्ये या निर्णयाबाबत एकमत झाले आहे. सुरूवातीला MSME, ऑटो, टूर अँड ट्रॅव्हल्स, हॉटेल्स आणि एव्हिएशन सेक्टर्सचा विचार करण्यात येणार आहे.

 

मागे

सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत, तोच विचार पुणे-पिंपरीबाबत : अजित पवार
सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत, तोच विचार पुणे-पिंपरीबाबत : अजित पवार

“कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार योग्य पावलं  ....

अधिक वाचा

पुढे  

कुत्र्यांनाही कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू
कुत्र्यांनाही कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू

जगभरात हैराण करुन सोडणार्‍या कोरोना विषाणूचा प्रभाव प्राण्यांवरही बघायल....

Read more