ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेस्टची दादर ते केईएम नवी सेवा सुरु 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 04:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बेस्टची दादर ते केईएम नवी सेवा सुरु 

शहर : मुंबई

          मुंबई - बेस्ट उपक्रमाने काही रहदारीच्या मार्गांवर मिनी व मेडी बससेवा सुरु केली आहे. भर गर्दीच्या दादर ते सिद्धिविनायक मंदिर मार्गावर यापूर्वी अशी बससेवा सुरू करण्यात आली असून आता दादर रेल्वेस्थानक ते केईएम रुग्णालयाचे मार्गावरही या बसच्या आधारे सेवा सुरू करण्यात आल्याने शेकडो प्रवासी आणि रुग्णांना दिलासा मिळणार आहे. 


          ठराविक गर्दीच्या मार्गांवर यापूर्वी टॅक्सी चालक मनमानी भाडे आकारताना दिसत असत. हे लक्षात घेऊनच बेस्टने काही मार्गावर मिडी आणि मिनी चालवण्याचा निर्धार केला. सध्याच्या घडीला बेस्टच्या ताफ्यात १६६ मिनी व मिडी बसेस आहेत.  याचा उपयोग रेल्वे स्थानक ते गर्दीच्या ठिकाणांपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर टॅक्सी व रिक्षा चालकांची जी दादागिरी चालत होती त्याला मोठ्या प्रमाणावर लगाम बसला आहे. यावर पर्याय म्हणून शेअर टॅक्सी व रिक्षा सेवा सुरु केली आहे.  मात्र त्याचेही कमीत कमी भाडेही १० ते १५ रुपये प्रत्येक प्रवाशामागे आकारले जात आहे. तर मिडी व मिनी बसचे किमान तिकीट दर ६ रुपये आहे. साहजिकच आणि प्रवासी या बससेवेचा लाभ घेताना दिसत आहेत. 


        दादरहून केईएम परिसरात जाणाऱ्या रुग्ण व प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने ए-२१७ क्रमांकाची एसी बस सेवा सुरु केली आहे.  ही बस सकाळी ६:५० वाजता व सकाळी आणि शेवटची बस रात्री १०:४०  वाजता सुटणार आहे. त्यामुळे गरीब रुग्ण व नातेवाईकांचे यापुढे टॅक्सीसाठी मोजावे लागणारे अधिकचे  पैसे वाचणार आहेत.

मागे

'खेलो इंडिया'च्या शुभारंभाच्या सोहळ्याला नरेंद्र मोदींची अनुउपस्थिती
'खेलो इंडिया'च्या शुभारंभाच्या सोहळ्याला नरेंद्र मोदींची अनुउपस्थिती

        गुवाहाटी - देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात ईश....

अधिक वाचा

पुढे  

‘आयएस’च्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक 
‘आयएस’च्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक 

      नवी दिल्ली – ‘आयएस’च्या तीन संशयित दहशतवाद्यांना आज सकाळी दिल....

Read more