ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पश्चिम रेल्वे प्रशासने मोबाइल तिकिटांसाठी आर वॉलेट रिचार्जवर देणार ५ टक्के बोनस

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 10:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पश्चिम रेल्वे प्रशासने मोबाइल तिकिटांसाठी आर वॉलेट रिचार्जवर देणार ५ टक्के बोनस

शहर : मुंबई

पश्चिम रेल्वे प्रशासने आता मोबाइल तिकिटांसाठी आर वॉलेट रिचार्जवर ५ टक्के बोनस देण्याच्या प्रक्रियेला ६ महिन्यांसाठीची मुदतवाढ दिलीय. यामुळे २४  ऑगस्टपर्यंत आर वॉलेट रिचार्ज रकमेवर प्रवाशांना ५ टक्के जास्त रक्कम वॉलेटमध्ये जमा होणार आहे. त्यामूळे तिकीट खिडक्यांवरील रांगेतील गर्दीतून सुटका करण्यासाठी तसेच लोकल तिकीट मिळविण्यासाठी मोबाइल तिकिटांचा वापर वाढविण्यासाठी वॉलेट रिचार्जवर पाच टक्के अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतलाय. तर, लोकल तिकीटसाठी स्मार्ट कार्ड, एटीव्हीएम, जेटीबीएसदेखील उपलब्ध आहे. यासाठी यूटीएस अॅ.प डाऊनलोड करणाऱ्या धारकांची संख्या १२ लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे. तसेच, २०१८-१९ मध्ये ५४ लाख १० हजार मोबाइल तिकिटांची विक्री झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलीय. मोबाइल रिचार्ज रकमेचे पाच टक्के प्रवाशांच्या वॉलेटमध्ये जमा होत होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही योजना संपुष्टात आली आहे. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेने आता या योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिलीय.

मागे

शिक्षकांना पहिल्यांदाच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार वेतन
शिक्षकांना पहिल्यांदाच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार वेतन

आता सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पहिले वेतन शिक्षकांच्या खात्यात राज्य ....

अधिक वाचा

पुढे  

बम्बार्डियर लोकल गाडय़ांची मध्य रेल्वेला अजूनही प्रतीक्षाचं
बम्बार्डियर लोकल गाडय़ांची मध्य रेल्वेला अजूनही प्रतीक्षाचं

आरामदायी आणि हवेशीर अशा बम्बार्डियर लोकल गाडय़ांची मध्य रेल्वे अजूनही प....

Read more