ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द

शहर : देश

बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा (Babri Demolition Case) निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे (CBI Special Court) न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव (Surendra Kumar Yadav) आज निवृत्त होत आहेत. त्यांनी आपली निवृत्तीच्या आधी या ऐतिहासिक प्रकरणावर निकाल सुनावला (CBI special court judge Surendra Kumar Yadav retired after Babri verdict). या प्रकरणी न्यायमूर्ती एस. के. यादव यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

सुरेंद्र कुमार यादव मागील वर्षी 30 सप्टेंबरलाच निवृत्त होणार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 19 जुलै रोजी त्यांच्या कार्यकाळात वाढ केली. त्यानुसार बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणाचा निकाल सुनावणीपर्यंत हा कार्यकाळ वाढवण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने देखील अधिसुचना काढत न्यायमूर्ती यादव यांचा कार्यकाळ वाढवला होता.

न्यायमूर्ती एस. के. यादव मुळचे जौनपूरचे रहिवासी

सुरेंद्र कुमार यादव पूर्व उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृष्ण यादव आहे. सुरेंद्र कुमार यादव 31 वर्षांचे असतानाच राज्य न्याय सेवेत निवडले गेले. त्यांनी सर्वात प्रथम फैजाबादमध्ये अॅडिशनल मुंसिफ पदावर कामाला सुरुवात केली. त्यांचा हा प्रवास पुढे गाजीपूर, हरदोई, सुल्तानपूर, इटावा, गोरखपूरमार्गे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ जिल्ह्याच्या न्यायमूर्तींपर्यंत पोहचला.

न्यायमूर्ती यादव यांच्याकडून सुरक्षेची मागणी

दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला यादव यांच्या सुरक्षेच्या मागणीकडे लक्ष देण्यास सांगत याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. तसेच दोन आठवड्यांमध्ये सरकारला यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.

मागे

Babri Case | बाबरी विध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त
Babri Case | बाबरी विध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्....

अधिक वाचा

पुढे  

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ची स्थापना करण्य....

Read more