ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त 

शहर : मुंबई

          मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा दणका दिला आहे. ईडीने चंदा कोचर यांचा मुंबई स्थित फ्लॅट जप्त केला आहे. त्यांच्या पतीची 78 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली आहे.

         चंदा कोचर कोचर यांच्याविरूद्ध ही कारवाई 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या 3250 कोटींच्या कर्ज प्रकरणात करण्यात आली आहे. कर्ज देताना गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये राजीनामा दिला होता. अलीकडेच त्यांनी आपल्याविरूद्ध बँकेने काढून टाकण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

 

 

काय आहे प्रकरण?


         व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात 20 बँकांकडून घेतलं होतं. 2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.


       चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असाही आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे.
 

मागे

JNU हिंसा: दिल्ली पोलिसांनी जारी केले आईशी घोषसह ९ हल्लेखोरांचे फोटो
JNU हिंसा: दिल्ली पोलिसांनी जारी केले आईशी घोषसह ९ हल्लेखोरांचे फोटो

       नवी दिल्ली - जेएनयूमधील सर्व्हर रुमची तोडफोड केल्याप्रकरणी पोलि....

अधिक वाचा

पुढे  

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक
शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक

            कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील गोकुळ शि....

Read more