ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाताळ, नववर्षांला संचारबंदी असणार? महापालिका लवकरच नियमावली जाहीर करण्याची शक्यता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2020 11:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नाताळ, नववर्षांला संचारबंदी असणार? महापालिका लवकरच नियमावली जाहीर करण्याची शक्यता

शहर : मुंबई

कोरोनाचा धोका अद्यापही कायम असताना राज्यात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशात गर्दी वाढून संसर्ग आणखी जीवघेणा होण्याची शक्यत आहे. यामुळे नाताळ (Christmas) आणि 31 डिसेंबरला (December 31) नववर्ष (New Year) स्वागताच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून (Municipal Corporation) आज किंवा उद्या नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. करोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे सण-समारंभांवर बंधनं असताना मोठ्या संख्येनं लोक नाइट क्लबमध्ये जमत असल्यामुळे यावर निर्बंध आणण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळ, नववर्षांला संचारबंदी किंवा नियमावली आणण्याचे सूतोवाच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले होते. 20 डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याची विनंती पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.

संचारबंदी लागू करण्याच्या मन:स्थितीत राज्य सरकार नाही. पण लोकांनीही वेळीच सावध व्हावं, असा इशाराच आयुक्तांनी दिला होता. 20 डिसेंबपर्यंत परिस्थिती पाहून नाताळ आणि 31 डिसेंबरसाठी नियमावली तयार करण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

याच पार्श्वभूमिवर आज किंवा उद्या याबाबत पालिकेकडून नियमावली जाहीर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, असं असलं तरी राज्यात पुन्हा लॉकडाऊन आणि संचारबंदी करावी असं मला वाटत नाही. पण नागरिकांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यामुळे एकीकडे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही असं एककीडे मुख्यमंत्री सांगत असताना दुसरीकडे संचारबंदीचे नियम लागू होतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, जनतेशी संवाद साधनात कडकडीत लॉकडाऊन करा अशी मागणी सर्व स्तरातून समोर येत आहे. पण आता लॉकडाऊनची गरज नसून प्रत्येकाने आतापर्यंत अनुभवातून शिकलं पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

मागे

नाताळमध्ये साई दर्शनासाठी शिर्डी संस्थानाची नवी नियमावली
नाताळमध्ये साई दर्शनासाठी शिर्डी संस्थानाची नवी नियमावली

नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासा....

अधिक वाचा

पुढे  

Metro car shed | शरद पवारांच्या मध्यस्थीवर भाजपची भूमिका काय?
Metro car shed | शरद पवारांच्या मध्यस्थीवर भाजपची भूमिका काय?

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल....

Read more