ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत उसळली दंगल;परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यु

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 01:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत उसळली दंगल;परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यु

शहर : विदेश

श्रीलंकेमध्ये 21 एप्रिलला चर्च आणि हॉटेलांबाहेर झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. तेथील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल भडकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित अटापट्टू यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यु लावला आहे. रविवारी ही घटना घडली. अफवांना रोखण्यासाठी सोशलमीडिया साईटवर बंदी आणण्यात आली आहे.

श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नेगोंबोतील एका चर्चचाही समावेश होता. मात्र, गेल्या 15 दिवसांमध्ये दोन समुदायांमध्ये झालेला हा पहिला प्रकार होता. रविवारी अधिकारी शहरातील शाळा पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत असताना दंगल उसळली. समाजकंटकांनी मोटारसायकल, कारच्या काचा फोडल्या. या भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने विशेष सुरक्षा दलाला पाचारण केले असून पोलीस तपास करत आहेत.

श्रीलंकेमध्ये सरकारने आपत्कालीन आणीबाणी लागू केली होती. यावेळी सुमारे 10 हजार सैनिक दहशतवादी ठिकाणांवर छापेमारी करत आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचा एक चमूही आहे. सुरक्षा दलांना तेथे कारवाई करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे.गेल्या वर्षीही श्रीलंकेमध्ये बौद्ध सिंहला आणि मुस्लिमांमध्ये दंगल उसळली होती. मुस्लिम संस्था बौद्धांचे जबरदस्ती धर्मपरिवर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हाही सरकारला कर्फ्यू लावाला लागला होता.

 

मागे

रॉकेट हल्ल्यानंतर इस्राईलचं गाझाला प्रत्यूत्तर, हवाई हल्ल्यात २०० ठिकाणं उद्धवस्त
रॉकेट हल्ल्यानंतर इस्राईलचं गाझाला प्रत्यूत्तर, हवाई हल्ल्यात २०० ठिकाणं उद्धवस्त

गाझाने रविवार रॉकेट हल्ला केल्यानंतर इस्राईलने प्रत्यूत्तर देत त्यांच्या....

अधिक वाचा

पुढे  

विठ्ठल-रुखमाई मंदिराला झेंडूच्या फुलांची आरास, तर दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवद्य
विठ्ठल-रुखमाई मंदिराला झेंडूच्या फुलांची आरास, तर दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवद्य

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे झेंडूच्या पिवळ्या ज....

Read more