ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गणेशाच्या निरोपासाठी अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 01:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गणेशाच्या निरोपासाठी अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी

शहर : मुंबई

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली.

 यावेळी उद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाईपर्यटन मंत्री जयकुमार रावलपदुम मंत्री महादेव जानकरकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेमुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दासमहापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणूक अनुभवण्यासाठी विविध देशांतून आलेली पर्यटकविविध देशांच्या दुतावासातील उच्चाधिकारीमान्यवर आदी उपस्थित होते. चौपाटीवर श्री गणेशाच्या विसर्जनासाठी जनसमुदायाची अलोट गर्दी झाली होती.

 गणेश भाविकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलएसआरपीएफफोर्स वनक्युआरटीफोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्सएनडीआरएफमहापालिकेच्या विविध यंत्रणा, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक सज्ज होते. सुरक्षेच्या कारणास्तव चौपाट्या आणि विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवण्यात आले होते.

मागे

टाकाऊ प्लास्टिकपासून बनवलेल्या बाकड्यांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण
टाकाऊ प्लास्टिकपासून बनवलेल्या बाकड्यांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण

'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेच्या वतीने टाकाऊ प्लास्टीकपासून साकारण्या....

अधिक वाचा

पुढे  

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप....

Read more