ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2021 06:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

शहर : मुंबई

कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस कुटुंबियांना 50 लाख मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोरोना काळात 98 पोलीस शहीद, 8 हजार कोरोनाबाधित झाले. पोलिसांच्या कर्तुत्वाला मुख्यमंत्र्यांनी कौतुकाची थाप दिली. पोलीस दलाची बदनामी करत होते त्यांची तोंड आता बंद झाल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

नववर्षाची सुरुवात अभिमान बहादुर सहकाऱ्यांसमवेत करत आहोत. काल मी वर्षावर होतो, मी बाहेर येऊन पाहिलं तर सर्व पोलिस दलातील सहकारी काम करत होते. या सर्व पोलिसांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. 8 हजार पोलीस कोरोना बाधित झाले. पोलीस वर्क फ्रॉम होम करू शकत नाहीत असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

अजूनही संकट पूर्णपणे टळलेलं नाही, म्हणून अजूनही काही गोष्टी सुरू केल्या नाहीत. नागरिकांचं कर्तव्य सुरक्षेच्या गोष्टी पाळा. भानावर राहून एक एक पाऊल टाकलं पाहिजे असे ते म्हणाले.

मुंबई पोलिसांना 150 वर्षांची परंपरा आहे. पोलीस दलाची बदनामी करत होते त्यांची तोंड आता बंद झाली आहेत. कारण मुंबई पोलिसांचं कर्तृत्व मोठं असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मागे

नव्या वर्षात महिलांसाठी सरकारकडून महत्वाची बातमी
नव्या वर्षात महिलांसाठी सरकारकडून महत्वाची बातमी

नव्या वर्षात महिलांसाठी राज्य सरकारकडून एक चांगली बातमी आहे. संकटग्रस्त मह....

अधिक वाचा

पुढे  

भारत - यूके दरम्यानची विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु
भारत - यूके दरम्यानची विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु

भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. (India-UK ....

Read more