ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 12:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शहर : मुंबई

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील यांनी राज्याला संबोधित करुन खबरदारीचं आवाहन केलं. घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे ‘वॉर अगेन्स व्हायरस आहे. आपण खबरदारी घेत आहात, पण आणखी खबरदारी घ्यायला हवं असं मुख्यमंत्री म्हणाले.

हा विषाणू हळूहळू पावलं पुढे टाकत आहे. आपण त्याला थोपवत आहोत. आपल्याकडचे रुग्ण सर्वजण बाहेरुन आलेले आहेत. अनवाश्यक असेल तर घरातून  अजिबात बाहेर पडू नका, बस, रेल्वेमधील गर्दी आणखी कमी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

कोरोना हे एक युद्ध आहे. आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत. आपण घाबरु नका, सरकार तुमच्यासोबत आहे. युद्धाचा आनुभव फार वाईट असतो. पण युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत, पण यंत्रणेवरील भार कमी करणं ही आपली जबाबदारी आहे. यंत्रणा सांभाळणारी ही सुद्धा माणसंच आहेत. कळत न कळत त्यांच्या मनातही धोका आहेच, पण तो धोका पत्करुन ते 24 तास काम करत आहेत. सरकारकडून ज्या सूचना दिल्या  जात आहेत, त्या पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. गर्दी टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच केलं आहे. जर लोकल ट्रेनमधील गर्दी कमी झाली नाही तर ट्रेन बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावं लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई ‘लॉकडाऊन करण्याची मागणी होत आहे. साखळी तोडून अर्थात ‘ब्रेक द चेन करुन कोरोनाला थोपवता येतं, त्याबाबत काही निर्णय घेतात का हे पाहावं लागेल.

मुख्यमंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

राज्यातील शासकीय कार्यालय एक दिवसाआड पद्धतीने  रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवाशी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.”

मुंबईत बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढवण्यासाठी बंद असलेल्या शाळेच्या बसेस वापरण्यात येतील.”

शहरातील सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु होती. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये काही बदल करण्यात येईल.”

मागे

आखाती देशांतील २६ हजार कोरोना संशयित मुंबईच्या वाटेवर, यंत्रणा सज्ज
आखाती देशांतील २६ हजार कोरोना संशयित मुंबईच्या वाटेवर, यंत्रणा सज्ज

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७१ वर गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना : मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोना : मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोनाची लागण देशभरात पसरत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख....

Read more