ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा

शहर : मुंबई

देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या विषाणूशी दोन हात करण्यासाठी राज्यसरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वी कधी नव्हे ती मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा आणि देशातील रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आपण जाऊ नये यासाठी राज्य सरकार मोठे निर्णय घेत आहेत.

1. महाराष्ट्र पूर्णपणे लॉक डाऊन

2. आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू, 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर निर्बंध

3. देशात परदेशी विमानांना आज मध्यरात्रीपासून बंदी

4. लोकल सेवा बंद , रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद

5. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील

6. अन्न-धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकानं सुरुच राहातील

7. बँका, वित्तीय संस्था सुरुच राहातील

8. शासकीय कार्यालयात आता केवळ 5 टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील, जमेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं

9. सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

उद्यापासून नागरी भागात जमावबंदी लागू. जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिथे करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेनेपार पाडायचे आहेत. सातत्याने मी आपल्याला सांगत आहे, आपण आता संवेदनशील टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारी कर्मचारी संख्या 25 वरुन 5 टक्क्यांवर आणली आहे. केवळ 5 टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहे. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील. मंदिरं, मशिदी चालू असतील तर ती तातडीने बंद करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

या संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासलं आहे. आज नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. रात्री अनेक जणांना वाटेल की आता नऊ वाजून गेले आता घराबाहेर पडूया. मी आपल्याला थोडीशी आणखी काळजी घ्यायला सांगणार आहे. किंबहुना नाईलाज म्हणून संचारबंदी किंवा जनता कर्फ्यूचा निर्णय घ्यावा लागत आहे. हा संयम आपल्याला उद्या सकाळपर्यंत ठेवायचा आहे. कृपया नऊ वाजेनंतर घराबाहेर पडू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

मागे

कोरोनाचा देशात आणखी एक बळी, मृतांची संख्या ७ वर
कोरोनाचा देशात आणखी एक बळी, मृतांची संख्या ७ वर

कोरोना व्हायरसमुळे भारतात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या सुरतमध्य....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना गुणाकार करतोय, आपण वजाबाकी करु : उद्धव ठाकरे
कोरोना गुणाकार करतोय, आपण वजाबाकी करु : उद्धव ठाकरे

कोरोना विषाणू गुणाकार करतो. हा गुणाकार टाळायचा असेल तर परदेशातून आलेल्या न....

Read more