ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईकरांचा प्रवास समुद्राच्या पोटातून; 19 फेब्रुवारीला खुला होतोय सागरी किनारा मार्ग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2024 08:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईकरांचा प्रवास समुद्राच्या पोटातून; 19 फेब्रुवारीला खुला होतोय सागरी किनारा मार्ग

शहर : मुंबई

१९ फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

शिवडी-न्हावा सागरी सेतू अलीकडेच मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. मुंबईचे रुपच बदलून टाकणाऱ्या या पुलाची सध्या चर्चा असतानाच आणखी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबईकरांसाठी खुला होतोय. सागरी किनारा मार्गाचा (कोस्टल रोड) पहिला टप्पा खुला होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महानगरपालिका आणि प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईत उड्डाणपुलांचे मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. कोस्टल रोडचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कोस्टल रोड प्रकल्पाचा समावेश आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा दहा किलोमीटरचा असून तो मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा आहे. या प्रकल्पाची किंमत 12 हजार कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळं मुंबईची वाहतुककोंडी घटणार आहे. पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 8 मिनिटांत कापता येणार आहे.

कोस्टल रोडचा पहिला टप्पा वांद्रे-वरळी सी लिंक ते मरीन ड्राइव्हपर्यंत असून यात बोगदा समुद्राच्या आतून रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसंच, समुद्रावर पुलही उभारण्यात आला आहे. सागरी किनारा मार्गामुळं इंधनाच्या खर्चात बचत होणार आहे.

कोस्टल रोडचे वैशिष्ट्ये म्हणजे या मार्गावरील बोगदे आणि मावळा बोअरिंग टनेल मशीन. मुंबईतील प्रियदर्शनी पार्क येथे दोन भुयारी मार्ग उभारले आहेत. या बोगद्यात दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन-तीन मार्गिका असतील. बोगदा खणण्यासाठी आणलेल्या टीबीएम मशीनला मावळा हे नाव देण्यात आले होते. मुंबईच्या जमीनीखाली 10 ते 70 मीटर खोल दोन बोगदे खोदले गेले. मावळाच्या मदतीने हे भूमिगत मार्ग तयार कऱण्यात आले आहेत.

कसा आहे कोस्टल रोड प्रकल्प

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क, प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस, बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी-लिंक अशा तीन टप्प्यांत विभागला आहे. मरीन ड्राइव्ह ते वरळी वांद्रे सी लिंकपर्यंत तीन इंटरचेंज (आंतरबदल) आहेत. पहिला इंटरचेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटरचेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. दरम्यान, इंटरजेंचच्या दरम्यान पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एकूण अठराशे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था आहे.

आदित्य ठाकरेंची टीका

कोस्टल रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरेंनी जुलै २०१३ मध्ये मांडला, त्यानंतर ह्या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. २०१७-१८ मध्ये कामाला सुरुवात झाली. २०२२ मध्ये आमचे सरकार भेकड गद्दारांनी पाडले, पण तोपर्यंत ६५% काम पूर्ण झाले होते. आम्ही दर आठवड्याला, प्रत्येक महिन्यात तेथे भेट देऊन कामाचा आढावा घेत होतो, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

ठाकरे पुढे म्हणाले की, भारतातल्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीन मावळा. कोविडच्या काळात हे मशीन आले, तेव्हा BMC अधिकाऱ्यांनी विचारले, ह्याला काय म्हणायचे? त्यावेळी मी "मावळा" नाव सुचवले. TBM चे काम पाहिल्यावर लक्षात येते, मुंबईतला मलबार हिल फोडून समुद्राखालचा तो पहिला बोगदा बनवला गेला.TBM च्या या कामाला साजेसं एकमेव नाव  मावळा. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच, ज्यांनी महाराजांना अशक्य कामातही यशस्वी मदत केली.

कोस्टल रोड आणि मुंबईशी अजिबात देणेघेणे नसलेल्या महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररित्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे राजकारणी या अर्धवट काम राहिलेल्या कोस्टल रोडचे उद्घाटन करुन निवडणुकीत श्रेय घेऊ पाहतील. काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणाऱ्यांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, असंही आदित्य यांनी म्हटलं आहे.

मागे

लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरिक कायद्याकडे एक पाऊल, ड्राफ्ट तयार
लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरिक कायद्याकडे एक पाऊल, ड्राफ्ट तयार

उत्तराखंडमधील पुष्करसिंह धामी सरकारने समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी ....

अधिक वाचा

पुढे  

45 वर्षीय फिटनेस आयकॉनचा हार्टअटॅकने मृत्यू, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी वाहीली श्रद्धांजली
45 वर्षीय फिटनेस आयकॉनचा हार्टअटॅकने मृत्यू, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी वाहीली श्रद्धांजली

दररोज 100 किलोमीटर सायकल चालविणाऱ्या सायकल पटू अनिल कडसूर यांचा हृदयविकाराच....

Read more