ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदींची तुलना शिवरायांशी केल्याने वाद उफळला 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदींची तुलना शिवरायांशी केल्याने वाद उफळला 

शहर : देश

            नवी दिल्ली - 'आज के शिवाजी – नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशित झालेल्या या पुस्तकात मोदी आणि छत्रपती शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरावरून टीका करण्यात येत आहे. गेल्या साडेतीनशे वर्षापासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्यात आल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. 


      दिल्ली भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहले आहे. काल (१२ जानेवारीला) भाजपचे प्रदेशाअध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. लवकरच दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एका धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

 


 

 

 

मागे

दूध दरवाढीचा लाभ व्यावसायिकांना
दूध दरवाढीचा लाभ व्यावसायिकांना

    पुणे - वर्षाच्या सुरुवातीलाच दूध दरवाढीची झळ सामान्य वर्गाला बसली आ....

अधिक वाचा

पुढे  

१२ व्या मजल्यावरून कोसळून कळंबोलीत तरूणीचा मृत्यू
१२ व्या मजल्यावरून कोसळून कळंबोलीत तरूणीचा मृत्यू

          कळंबोली : खारघरच्या सेक्टर ३५ मध्ये १२ व्या मजल्यावरून कोसळून ....

Read more