ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशात गेल्या 24 तासात 66,999 लोकांना कोरोनाची लागण, 942 रुग्णांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात गेल्या 24 तासात 66,999 लोकांना कोरोनाची लागण, 942 रुग्णांचा मृत्यू

शहर : देश

देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या 24 तासात 56,383 लोकांनी  कोरोनावर मात केली आहे. आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट आता 70 टक्क्यांहून अधिक झाला आहे. यासह देशभरात एकाच दिवसात सर्वाधिक 7 लाख 33 हजार 449 कोरोना टेस्ट करण्यात आल्या.देशातील कोरोनामुळे मृतांची संख्या 47 हजारांच्या पुढे गेली आहे. तर जवळपास 24 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

गुरुवारी सकाळी जाहीर झालेली आकडेवारी

गेल्या 24 तासात कोरोनामुळे 942 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात 66,999 लोकांना कोरोनाची लागण

एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 23,96,637

एकूण मृत्यू 47,033

एकूण उपचार घेत असलेले रुग्ण 6,53,622

बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16,95,982

बुधवारी मुंबईत 1,132 नवीन रुग्णांची वाढ झाली. तर 50 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत सुमारे 7000 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करुन बरे झालेल्या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईतील तीन रुग्णालयात 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरू करण्यात आली आहे.

आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पण त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, त्यामुळे ते घरीच उपचार घेत आहेत. याआधी गृहमंत्री अमित शाह तसेच मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

 

मागे

राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, राजू शेट्टी आक्रमक
राज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, राजू शेट्टी आक्रमक

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मात्र, राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्य....

अधिक वाचा

पुढे  

नागपुरात दुकानदारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, तुकाराम मुंढेंचे आदेश
नागपुरात दुकानदारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, तुकाराम मुंढेंचे आदेश

नागपुरात दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दुकानातील कर....

Read more