ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई सेंट्रलमध्ये एकाच सोसायटीत 55 रुग्ण आढळल्याने खळबळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 25, 2020 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई सेंट्रलमध्ये  एकाच सोसायटीत 55 रुग्ण आढळल्याने खळबळ

शहर : मुंबई

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मुंबईला जेरीस आणल्याचं दिसत आहे. आता नव्याने मुंबई सेंट्रल येथे कोरोनाची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत एकाच वेळी तब्बल 55 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ही संपूर्ण सोसायटी सील करण्यात आली. हा संसर्ग सोसायटीली अनेक लोकांपर्यंत पोहचला असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाने नवजीवन सोसायटीतील अनेकांचे स्वॅब नमुने घेतले असून या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना चाचणीचे अहवाल आल्यानंतरच नेमका किती जणांना कोरोना संसर्ग झालाय हे कळणार आहे. प्रशासनाने पूर्ण सोसायटी सील केली आहे. तसेच अनेकांना त्यांच्या घरातच होम क्वारंटाईन केलंय.

मुंबई सेंट्रलची नवजीवन सोसायटी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. मागील दिड महिन्यात येथे 55 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण इमारतच सील करण्यात आली. मुंबईमधील कोरोना विषाणूने पुन्हा इमारतींमध्ये प्रवेश केला आहे. तीन पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेल्या इमारती पूर्ण सिल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची सुरुवात डी विभागातील मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीपासून झाली.

या इमारतीत गेल्या दिड महिन्यात 55 रुग्ण आढळून आले आहेत. याच इमारतीत नव्याने पुन्हा 5 रुग्ण आढळून आल्याने ही इमारत सील करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत सध्या अंधेरी ते दहिसर, भांडूप, मुलुंड, ग्रॅंटरोड या विभागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईतील हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. या विभागात विशेष करुन इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार सर्वाधिक झाला आहे.

इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार होत असल्याने पालिकेने तीन रुग्णाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला. डी वॉर्डत आतापर्यंत 3,903 रुग्ण आढळले. यापैकी 2,845 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर 162 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखाच्या पुढे गेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 6 हजारांच्या जवळ पोहचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यात मुंबई सेंट्रलमधील एकाच सोसायटीत 70 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्याने काळजी वाढली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात 19 हजार 510 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा 3 लाख 57 हजार 117 वर पोहोचला आहे. राज्यात 23 जुलै रोजी 9 हजार 895 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 24 जुलै रोजी 9 हजार 615 नवे कोरोनाबाधित आढळले. विशेष म्हणजे 22 जुलै रोजी सर्वाधिक 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंता वाढली आहे.

दिवसभरात 278 रुग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात 278 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.68 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 13 हजार 132 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 5 हजार 714 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात दिवसभरात 5 हजार 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 43 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.99 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मागे

मुंढेंचा दणका; कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन
मुंढेंचा दणका; कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन

लोकप्रतिनिधींशी सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत असलेले नागपूर महानगरपालिक....

अधिक वाचा

पुढे  

परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही : उद्धव ठाकरे
परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही : उद्धव ठाकरे

“अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवले आ....

Read more