ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 01, 2020 11:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण

शहर : मुंबई

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या साथीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. येथे कोरोनाचे ३०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूने आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये शिरकाव केला आहे. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

हा रुग्ण ५६ वर्षांचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबातील ते १० जणांना क्वारंटाइन करणयात आलं आहे. ज्या इमारतीत हा रूग्ण राहत आहेत त्या इमारतीला सील करण्यात आलं आहे. धारावी १५ लाख लोकं राहतात. धारावी हे ६१३ हेक्टर क्षेत्रावर पसरले आहे. धारावीमध्ये लाखो मजुरी करणारे आणि छोटे व्यापारी राहतात.

बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे १८ नवीन रुग्ण आढळले. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत फक्त बाहेरुन येणाऱ्या लोकांना कोरोना झाला होता. पण आता तो येथील सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत फक्त श्रीमंतामध्ये आढळलेला कोरोना आता राज्यातील गरीब व्यक्तींपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ३३५ रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी ४१ जणांना घरी सोडण्यात आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागे

वरळी कोळीवाड्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह, काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवलं
वरळी कोळीवाड्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह, काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवलं

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे एक-दोन नव्हे तर तब्बल 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यान....

अधिक वाचा

पुढे  

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी
धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी

धारावीतील 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा (Dharavi corona positive patient death) आज रात्री कस्तूरबा ....

Read more