ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जाणून घ्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू का झालाय आऊट ऑफ कंट्रोल?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 22, 2020 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जाणून घ्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू का झालाय आऊट ऑफ कंट्रोल?

शहर : देश

ब्रिटनसह युरोपच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नव्या प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे. (Coronavirus B.1.1.7 Mutation in Britain)

कोरोना व्हायरसमधील हे म्युटेशन सामान्य आहे का?

लीसेस्टर विद्यापीठातील वैद्यकीय संसर्गतज्ज्ञ डॉ. ज्युलियन टँग यांच्या माहितीनुसार, विषाणूत अशाप्रकारचा बदल (म्युटेशन) सामान्य बाब आहे. इन्फ्लूएंझाप्रमाणे विविध विषाणू एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतात. यामधून हायब्रिड व्हायरसची निर्मिती होऊ शकते.

तर लीव्हरपूल विद्यापीठातील प्राध्यापक ज्युलियन हिसकॉक्स यांच्या मतानुसार कोरोनाच्या विषाणूमध्ये सतत बदल घडत असतात. त्यामुळे SARS-CoV-2 चे नवे प्रकार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानव आणि प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या विषाणुंबाबत ही परिस्थिती नेहमी पाहायला मिळते.

B.1.1.7 महत्त्वाचा का?

चीनच्या वुहानमध्ये पहिल्यांदा SARS-CoV-2 मध्ये बदल पाहायला मिळाले होते. मात्र, या बदलांचे स्वरुप लक्षणीय नव्हते. याउलट ब्रिटनमध्ये आढळलेल्या B.1.1.7 ची जेनेटिक लक्षणे पाहता कोरोनाच्या मूळ विषाणुमध्ये मोठे बदल झालेले दिसत आहेत. विशेषत: कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये लक्षणीय बदल दिसत आहेत.

त्यामुळे सध्याची उपचारपद्धती फोल ठरण्याची शक्यता आहे. सध्या युरोपच्या अनेक भागांमध्ये नव्या कोरोना विषाणूची लक्षणे असलेले रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये तातडीने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाचा नवा विषाणू आणखी घातक आहे का?

ब्रिटनमधील काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या अंदाजनुसार कोरोनाचा नवा विषाणू अधिक वेगाने पसरणारा असू शकतो. मात्र, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा नव्या कोरोना विषाणुचा 40 ते 70 टक्क्यांनी जलद प्रसार होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या सध्याच्या लशींची परिणामकारकता कमी होण्याचा धोका आहे.

भारतासाठी हा कोरोना स्ट्रेन डोकेदुखी ठरणार?

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळं भारताची चिंता वाढली आहे. यामुळंच ब्रिटनहुन येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. ICMRच्या संचालकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नव्या कोरोना स्ट्रेनचा संसर्ग पसरण्याचा दर कोरोनाहून कित्येक पटीनं अधिक आहे. त्यामुळं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्लडमध्ये सध्या कडक पद्धतीनं कोरोना नियम राबवले जात आहेत.

मागे

UK New Coronavirus Strain | चिंता वाढली! लंडनहून दिल्लीला आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह
UK New Coronavirus Strain | चिंता वाढली! लंडनहून दिल्लीला आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा नाईट कर्फ्यू लागलेला असतानाच, चिंता वाढवणा....

अधिक वाचा

पुढे  

राज्यातील महिलांना बंदूक परवाने द्या, वंचित बहुजन आघाडीची मागणी
राज्यातील महिलांना बंदूक परवाने द्या, वंचित बहुजन आघाडीची मागणी

वंचित बहुजन आघाडीनं कोल्हापुरात भव्य मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांपासू....

Read more