ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धक्कादायक ! एअर इंडियाचा प्रत्येक सहावा कर्मचारी कोरोनाबाधित

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 17, 2021 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

धक्कादायक ! एअर इंडियाचा प्रत्येक सहावा कर्मचारी कोरोनाबाधित

शहर : मुंबई

एअर इंडियाचा (Air India) प्रत्येक सहावा कर्मचारी हा कोरोना बाधित आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे एअर इंडियाच्या १९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालायकेंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप (Hardip Singh) सिंग पुरी यांनी संसदेत लेखी स्वरूपात याबाबत माहिती दिली. वंदे भारत मोहिमेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालीय.

रुग्णसंख्या वाढली

मुंबईत जानेवारी महिन्यात कोरोना रुग्ण (Covid19) संख्या वाढू लागली आहे. दिवसाला सरासरी ३०० ते ३५० रुग्ण वाढ होत होती. पण आता हा आकडा ६५० पर्यंत पोहोचला आहे. मुंबईत लोकल (Mumbai Local) सर्वांसाठी सुरु केल्यानंतर १५ दिवसांनी निरीक्षणांचा कालावधी आहे२१ फेब्रुवारीला संपत असल्याने २२ फेब्रवारीला महापालिका आढावा घेणार आहे.

२२ फेब्रुवारीपर्यंत रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर लोकलबाबतचा निर्णय हा बदलला जावू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षावर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईसह इतर शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या रुग्ण संख्येत विदर्भात झपाट्यानं वाढ होतेय. त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या शहराचा समावेश आहे. अकोल्यात गेल्या आठवडाभरात पाचशेच्या वर रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढलीय.कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी काही नवीन नियमावली तयार करण्यात आलीय.ही नियमावली 28 फेब्रुवारी पर्यंत राहणारे आहे.

मागे

Night Curfew : 'या' शहरांमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू
Night Curfew : 'या' शहरांमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

गेल्या वर्षापासून देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थौमान घातल....

अधिक वाचा

पुढे  

दहावी, बारावीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
दहावी, बारावीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आ....

Read more