ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्रालयात सल्लागारांचा सुळसुळाट थांबणार, राज्याचे दरमहा 60 कोटी वाचणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 07:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्रालयात सल्लागारांचा सुळसुळाट थांबणार, राज्याचे दरमहा 60 कोटी वाचणार

शहर : मुंबई

भाजप सरकारच्या काळात मंत्रालयात सल्लागारांचा सुळसुळाट झाला होता. सगळे मिळून 400 सल्लागार तैनात करण्यात आले होते. यांच्या मानधनावर 120 कोटी महिन्याता खर्च होत आहे. काही सल्लागारांना तर मुख्य सचिवांपेक्षा अधिक मानधन मिळत होते. सल्लागारांची संख्या आणि मानधनात कपात केल्याने राज्याचे दरमहा 60 कोटी वाचतील असा दावा वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे. सल्लागारांवरील उधळपट्टी थांबवा राज्य सरकारचे निर्देश दिले आहेत. सल्लागाराच्या संख्येवर मर्यादा घालत इथून पुढे केवळ दोनच सल्लागार असतील.

टाळेबंदीमुळे राज्याची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याने राज्य सरकारने अनावश्यक खर्च कमी करण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने विविध विभाग आणि उपविभागांमधील सल्लागारांच्या मानधनात 30 टक्के कपात करण्याबरोबरच अवघे दोनच सल्लागार ठेवावेत, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची दरमहा 60 कोटींची बचत होणार असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तब्बल 400 सल्लागार कार्यरत

मंत्रालयात काही वर्षांपासून नवनव्या योजना, प्रकल्पाच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी तब्बल 400 सल्लागार कार्यरत होते. त्यांच्या मानधनापोटी दरमहा सुमारे 120 कोटी रुपयांचा खर्च केला जात होता. या सल्लागारांचे मासिक मानधन राज्याच्या मुख्य सचिवापेक्षाही अधिक होते. आता वित्त विभागाच्या नव्या निर्बंधामुळे या खर्चाला कात्री बसेल. मंत्रालयातील विविध विभागांचा कारभार सचिव अर्थात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. मात्र, तरीही काही वर्षांपासून मंत्रालयात सल्लागार नियुक्तीची नवी प्रथाच रुढ झाली. त्यामध्ये काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश होता. संबंधित विभागाच्या कामाची सर्व माहिती असतानाही आरोपांची ब्याद नको म्हणून हल्ली सर्वच विभागांमध्ये योजनांची आखणी, अंमलबजावणी सल्लागारांच्या माध्यमातूनच करण्याची नवी परंपरा मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सुरू झाली आहे.

काही ठराविक विभागांमध्ये तर 10 ते 15 सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, योजना चांगली झाल्यास ती आमची आणि फसली की सल्लागाराची, असे सांगून वेळ मारून नेण्याची प्रथाही मंत्रालयात रुढ होऊ लागली आहे. तर हेच सल्लागार ठेकदार आणि सरकारला एकाचवेळी सल्ला देत असल्याचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या आदेशातील ठळक बाबी...

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग उपविभागांनी गरज असल्यासच सल्लागार निवडावेत.

31 डिसेंबर 2021 पर्यंत प्रत्येक उपविभागीयनिहाय गरज असणारेच सल्लागार असावेत.

मंत्रालयातील प्रत्येक विभाग तथा उपविभागांमध्ये किमान दोनच सल्लागार असावेत.

सध्याच्या सल्लागारांच्या मानधनात 30 टक्क्यांची कपात करावी.

मानधनाचे निकष

15 वर्षाचा अनुभव : 3,56,400 रुपये

8 ते 15 वर्षाचा अनुभव : 3,06,900 रुपये

5 ते 8 वर्षाचा अनुभव : 2,77,200 रुपये

3 ते 5 वर्षाचा अनुभव : 2,47,500 रुपये

6 महिने ते 3 वर्षाचा अनुभव : 1,90,00 रुपये

मागे

झेंडूला प्रतिकिलो विक्रमी दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न
झेंडूला प्रतिकिलो विक्रमी दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न

उत्तर कोरेगाव हा सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला प्रदेश ....

अधिक वाचा

पुढे  

अनलॉक-3 बाबत केंद्राचं राज्याला पत्र, पत्राची राज्याच्या गृहखात्याकडून दखल
अनलॉक-3 बाबत केंद्राचं राज्याला पत्र, पत्राची राज्याच्या गृहखात्याकडून दखल

केंद्र सरकारकडून अनलॉक 3 मध्ये बरेच निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, अनेक र....

Read more