ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दादरचे भाजी मार्केट पूर्णपणे बंद, गर्दी आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाचा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 05, 2020 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दादरचे भाजी मार्केट पूर्णपणे बंद, गर्दी आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाचा निर्णय

शहर : मुंबई

राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधं यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. या सेवा 24 तास सुरु राहणार आहे. मात्र दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे मार्केट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

दादरच्या सेनापती बापट मार्गावर घाऊक भाजीपाला मार्केट  आहे. या ठिकाणी अनेक मुंबईकर नियमित भाजी खरेदी करताना दिसतात. मात्र कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी या मार्केटचे चार ठिकाणी विभाजन करण्यात आलं होतं. तर काही टक्के मार्केट हे दादरमध्ये ठेवण्यात आले होते. पण घाऊक मार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याने पालिकेने हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता हे मार्केट दहिसर जकात, एमएमआरडीए अॅक्झिबिशन सेंटर, मुलुंड जकात नाका, सोमय्या ग्राऊंड या ठिकाणी सुरु राहणार आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने गर्दी करु नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार जनतेला करत आहेत. पण जनता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी झुंडीने गर्दी करत आहे. दादरमध्येही भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता या मार्केट चार ठिकाणी विभाजन करण्यात आले. यासाठी भाजी विक्रेत्यांना मैदान देण्यात आली. मात्र या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील एम.एम.आर.डी. मैदानावर अनेक भाजीचे ट्रक टेम्पो या परिसरात आले आहेत. पण तरीही या ठिकाणी कोणीही सोशल डिस्टन्सचा नियम पाळत नाही. तसेच तोंडाला मास्कही लावत नाही.यामुळे जर या ठिकाणी एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण आला तर यातील अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागे

Corona : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 142 जण क्वारंटाईन
Corona : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 142 जण क्वारंटाईन

मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या CISF च्या 11 जवानांना कोरोनाची  लागण झाल्य....

अधिक वाचा

पुढे  

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष....

Read more