ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

सांगलीत पुराचा धोका, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 10:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सांगलीत पुराचा धोका, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

शहर : सांगली

जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट इतकी झाली आहे. त्यामुळे सांगलीत पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरले आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने  वारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, काखे मांगले आणि कोकरूड रेठरे पुल पाण्याखाली गेले आहेत.

पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला जाऊ शकतो, त्यामुळे वारणा नदी काठच्या ग्रामस्थांनी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

                

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी पंचगंगेला केवळ दोन फूट बाकी आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फूट इंचावर आहेजिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.

 

मागे

पुराच्या पाण्यात सूर मारला, ग्रामस्थ व्हिडीओ काढत बसले, युवक वाहून गेला!
पुराच्या पाण्यात सूर मारला, ग्रामस्थ व्हिडीओ काढत बसले, युवक वाहून गेला!

नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस युवकाच्या अंगलट आले आहे.....

अधिक वाचा

पुढे  

सातासमुद्रापार, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले भगवान राम आणि राममंदिराचे फोटो
सातासमुद्रापार, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले भगवान राम आणि राममंदिराचे फोटो

अयोध्येतील राममंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार....

Read more