ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘धारावीतील ‘त्या’ झोपड्यांना जमीनदोस्त करा’, मुंबई महापालिकेचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2023 06:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘धारावीतील ‘त्या’ झोपड्यांना जमीनदोस्त करा’, मुंबई महापालिकेचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

शहर : मुंबई

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन मुंबईतलं राजकारण तापलं आहे. असं असताना मुंबई महापालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना वांद्र्यातील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी या मुद्द्यावरुन धारावीत भव्य मोर्चा काढला होता. उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समूहाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर खरेदी केलं आहे. त्यामुळे अदानी उद्योग समूहाकडून धारावीत पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणार आहे. पण याच गोष्टीला उद्धव ठाकरेंचा विरोध आहे. सरकारने फक्त अदानी यांनाच का प्रकल्प दिला, तसेच त्यांनी या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप केला. त्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं होतं. धारावीतील नागरिकांना प्रत्येकी 500 चौरस फुटाचं घर मिळावं, अशी देखील मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काहीच बोलले नाहीत. याउलट नुकतीच शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट घडून आली. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आता मुंबई महापालिकेने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत वांद्र्यातील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.

मुंबई महानगरपालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना धारावीतील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पत्र जारी करण्यात आलं आहे. मुंबईतील धारावीचा पुनर्विकास जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी अनेक अनधिकृत बांधकाम सुरू झाले आहेत. जी अनधिकृत बांधकाम आहेत, त्यावर तातडीने तोडक कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मुंबई महानगरपालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.

धारावीतयानागरिकांना घरे मिळणार

नियमानुसार, 1 जानेवारी 2000 सालापर्यंतच्या झोपडी धारकांना या ठिकाणी अदानी उद्योग समूहाकडून होत असलेल्या पुनर्विकासामध्ये 305 चौरस फुटाचे घर मिळणार आहे. तर साल 2000 ते 2011 पर्यंत इथे उभारण्यात आलेल्या घरांना बाजारभावाप्रमाणे स्वतः पैसे भरून घर मिळवता येणार आहेत. पण त्यानंतरची सगळी घरं ही अनधिकृत असल्याने त्यावर तोडक कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मुंबई महालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून आशियातील या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत भरारी पथक नेमून या सर्व परिसराची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या गोष्टीला राजकीय विरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

 

 

 

Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे |

 

मागे

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दि....

अधिक वाचा

पुढे  

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसर भाविकांनी गजबजला…
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसर भाविकांनी गजबजला…

दगडूशेठ, अंबाबाई, सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी; नवीन वर्षाच्या पहि....

Read more