ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वरळीनंतर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या उंबरठ्यावर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 03, 2020 06:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वरळीनंतर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या उंबरठ्यावर

शहर : मुंबई

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये (Dharavi Corona Patient Update) कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाच्या पायखालची वाळूच सरकली होती. अत्यंत दाटीवाटीने असलेली घरे, अस्वच्छता इत्यादींचे मोठे आव्हान मुंबई महापालिकेसमोर होते. धारावी परिसरातील एकूण रुग्ण संख्या 500 जवळ गेली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

धारावी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 500 च्या उंबरठ्यावर (Dharavi Corona Patient Update) पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसात 127 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. काल एका दिवसात तब्बल 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वरळीनंतर आता धारावी परिसर सर्वाधिक संवेदनशील विभाग बनला आहे.

धारावीमध्ये एकूण 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचीही झोप उडाली होती. आज (3 मे) 38 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीमधील कोरोनाबाधितांचा आकडा 496 वर पोहोचला आहे. यातील 18 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्ये महापालिकेने आपले नऊ दवाखाने सुरु केले आहेत. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे केला जाणार आहे. तसेच 350 खासगी दवाखान्यांच्या मदतीने तब्बल 25 हजार लोकांची तपासणी करण्यात आली. यापैकी ताप, सर्दी, खोकला असलेल्या 1 हजार 920 लोकांची चाचणी तर 2 हजार 050 लोकांना क्वारंटाईन केले आहे. तर आतापर्यंत धारावी परिसरात 79 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे.तसेच 2 हजार 050 लोकांना धारावी पालिका शाळा, राजीव गांधी क्रीडा संकुल, मनोहर जोशी विद्यालय, माहीम नेचर पार्क येथे ठेवण्यात आले आहे.

मुंबई महापालिका मुंबईत कोरोनाचे आकडे वाढत असले तरी मृत्यूदर कसा कमी करता येईल याकडे जास्त लक्ष देत आहे. धारावीत गेले काही दिवस आकडे वेगाने वाढत आहे. गेल्या दोन दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. पण एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू आलेला (Dharavi Corona Patient Update) नाही

मागे

राजकारण बाजूला ठेवा, राष्ट्रीय मुद्दा समजून निर्णय घ्या, IFSC वरुन पवारांचं मोदींना खरमरीत पत्र
राजकारण बाजूला ठेवा, राष्ट्रीय मुद्दा समजून निर्णय घ्या, IFSC वरुन पवारांचं मोदींना खरमरीत पत्र

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) मुंबईहून गुजरातमध्ये नेण्यावरुन महार....

अधिक वाचा

पुढे  

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला
राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ....

Read more