ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2020 09:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार

शहर : मुंबई

राज्यात लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डीजीपी सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार आहेत. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती, ती विनंती मान्य करण्यात आली आहे. पोलिसांमधील बदल्या जैस्वाल यांना पटत नव्हत्या. या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका, असंही जैस्वाल यांना सुनावलं गेले होते. नक्षलग्रस्त भागातील नियुक्ती सक्तीची हवी, असंही जैस्वाल यांचं म्हणणं होतं. 22 आयपीएस अधिकारी नक्षलग्रस्त भागात गेलेच नाहीत, असंही जैस्वाल यांनी सांगितलं होतं.

सुबोध जैस्वाल हे केंद्र सरकारमध्ये होते, त्यानंतर ते मुंबईत आले. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि  ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. सरकार आणि सुबोध जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्या मी होऊ देणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला होता. राज्य सरकारबरोबर पटत नसल्यानं पुन्हा एकदा त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तशी त्यांनी ठाकरे सरकारला विनंती केली होती. सुबोध जैस्वाल हे केंद्रात गेल्यानंतर राज्यात पोलीस महासंचालकपद रिक्त होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मागे

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री
केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री

राज्यातील वाढत्या वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने दिल्....

अधिक वाचा

पुढे  

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरू, विद्यार्थी संभ्रमात
राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरू, विद्यार्थी संभ्रमात

राज्यातील वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरू झाली आहे. म....

Read more