ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रुग्णसेवा नाकारणाऱ्या रुग्णालयं आणि डॉक्टरांवर होणार कारवाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 25, 2020 06:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रुग्णसेवा नाकारणाऱ्या रुग्णालयं आणि डॉक्टरांवर होणार कारवाई

शहर : मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पण, या परिस्थितीमध्येही प्रशासनाकडून सर्वतोपरी लढा देत नागरिकांनाही कोरोनाच्या संकटाला धीराने सामोरं जाण्याचा विश्वास दिला आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोरे जात आहेत. सोबतच खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करत आहेत. पण काही डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयं मात्र त्यांच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत.

खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सध्या मोठी आणिबाणी देशावर आलेली आहे. अशा समाजातील सर्व घटक देशासमोरील या संकटाला सामोरं जात असतानाच आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी मात्र रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

एकंदर परिस्थिती पाहता या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं आहे. आपणाकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचाच्या संदर्भात लक्षणे आढळल्यास आपण आपल्या परिसरातील शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी असंही त्यांना सांगण्यात आलं आहे.

मागे

कोरोना व्हायरस लॉकडाऊन : वसईत टवाळखोर दुचाकीस्वारांनी पोलिसाला उडवले; प्रकृती गंभीर
कोरोना व्हायरस लॉकडाऊन : वसईत टवाळखोर दुचाकीस्वारांनी पोलिसाला उडवले; प्रकृती गंभीर

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा होऊनही नागरिक गां....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम महाराष्ट्र, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस
पश्चिम महाराष्ट्र, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार प....

Read more