ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 06, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

शहर : मुंबई

शोषित, पीडित आणि दुर्लक्षितांना जगण्याचं आत्मभान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे असणाऱ्या चैत्यभूमीवर हजारो भीमसैनिक दाखल झाले आहेत.

दादरमधील शिवाजी पार्कवर जणू भीमसागर उसळल्याचं चित्रं पाहायला मिळत आहेझालं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्कवर सर्व सोयी -सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. डिसेंबरपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. यंदाच्या वर्षी चैत्यभूमीवर गर्दीचा उच्चांक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गुरुवारपासूनच शिवाजी पार्क परिसर आणि विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त एका अद्वितीय व्यक्तीमत्त्वाला म्हणजे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबेडकरी गायक, कलावंत भीमगीतं गाऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करत आहेत. कविसंमेलनांमधूनही महामानवाला अभिवादन केलं जात आहे.

एकिकडे संपूर्ण कुटुंबासह बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करणाऱ्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे प्रशासनाकडून या प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. त्यांच्यासोबतच अनेक राजकीय नेतेमंडळीसुद्धा येथे उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

 

मागे

आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही
आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने र....

अधिक वाचा

पुढे  

हैदराबाद एन्काऊंटरनंतर नागरिकांचा जल्लोष, पोलिसांवर फुलांचा वर्षाव
हैदराबाद एन्काऊंटरनंतर नागरिकांचा जल्लोष, पोलिसांवर फुलांचा वर्षाव

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरो....

Read more