ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘एस्प्लनेड मेन्शन’ पूर्ण रिकामी करा - उच्च न्यायालयाचे ‘म्हाडा’ला आदेश

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘एस्प्लनेड मेन्शन’ पूर्ण रिकामी करा - उच्च न्यायालयाचे ‘म्हाडा’ला आदेश

शहर : मुंबई

दक्षिण मुंबईमधील काळाघोडा परिसरातील धोकादायक अवस्थेत असलेली एस्प्लनेड मेन्शनइमारत १५ मेपर्यंत पूर्णपणे रिकामी करा. गरज भासल्यास पोलीस बळाचा वापर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी म्हाडाला दिले. एवढेच नव्हे, तर गुरुवारपासूनच ही कारवाई सुरू करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. इमारत रिकामी केल्यानंतर तिची तातडीने दुरुस्ती सुरू करण्याचे आदेशही न्यायालयाने म्हाडाला दिले.

एस्प्लनेड मेन्शनमधील आर्मी रेस्टॉरंटपाठोपाठ अन्य आठ दुकानदारांनाही पालिकेने नोटीस बजावली होती. ग्राहकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या दुकानदारांनी २४ तासांत आपले दुकान बंद करावे. अन्यथा त्यास टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने या नोटिशीद्वारे दिला होता. म्हाडाची उपकर प्राप्त असलेली ही इमारत २००७ मध्ये धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्या वेळी इमारतीच्या मालकाच्या घरासह त्यातील कार्यालये रिकामी करण्याची नोटीस म्हाडाने बजावली होती. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या दोन्ही प्रकरणांवर एकत्रित सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने इमारतीची स्थिती लक्षात घेत त्यात कार्यालये थाटणारे वकील, मालक असे सर्वानाच धारेवर धरले. मालकाला इमारत रिकामी करायची नसेल तर त्याने उद्याच्या उद्या १० कोटी रुपये न्यायालयात जमा करावेत आणि स्वत:च्या जबाबदारीवर तेथे वास्तव्य करावे, अशा शब्दांत खडसावले. त्यानंतर मालकासह वकिलांनीही इमारत रिकामी करण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले.

इमारत रिकामी करण्याबाबत मालक आणि वकिलांनी दाखवलेल्या तयारीनंतर न्यायालयाने १५ मेपर्यंत इमारत रिकामी करण्याचे आदेश म्हाडाला दिले. इमारत रिकामी करण्याची कारवाई उद्यापासूनच करण्याचेही न्यायालयाने बजावले.

मागे

पेटीएमकडून नवीन सेवा,ग्राहकांसाठी  घर बसल्या पैसे कमवण्याची संधी
पेटीएमकडून नवीन सेवा,ग्राहकांसाठी घर बसल्या पैसे कमवण्याची संधी

पेटीएम ई-वॉलेट कंपनी ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही ....

अधिक वाचा

पुढे  

राहुल गांधी यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल
राहुल गांधी यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी....

Read more