ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Farmers Protest: मोदी सरकार आणि शेतकऱ्यांमधील निर्णायक चर्चेकडे साऱ्या देशाचे लक्ष

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2020 08:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Farmers Protest: मोदी सरकार आणि शेतकऱ्यांमधील निर्णायक चर्चेकडे साऱ्या देशाचे लक्ष

शहर : देश

कृषी कायदे रद्द (Farm laws) करण्याच्या मागणीसाठी गेल्या 34 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बुधवारी निर्णायक चर्चा होणार आहे. दुपारी दोन वाजता दिल्लीच्या विज्ञान भवनात शेतकरी प्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात शेतकरी आंदोलकांना (Farmers protest) चर्चेसाठी जाहीर निमंत्रण दिले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत केंद्र सरकारकडून काही सकारात्मक पाऊल उचलले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी मंगळवारी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या बैठकांचा आढावा घेतला. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची बुधवारची बैठक आटोपल्यानंतर आपण अन्य नेत्यांशी बोलून संयुक्त पुरोगामी आघाडीची (UPA) भूमिका स्पष्ट करु, असे शरद पवार यांनी सांगितले.

अमित शाह आणि नरेंद्रसिंह तोमर यांची बैठक

शेतकऱ्यांशी बुधवारच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मंगळवारी बैठक झाली. त्यात केंद्र सरकारची भूमिका निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना बुधवारी दुपारी 2 वाजता बैठकीला बोलावले आहे. 40 शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून मंगळवारी बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यात तिन्ही नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा आणि किमान आधारभूत मूल्याला (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या अटीसह अन्य काही मुद्दय़ांचा समावेश होता.

मात्र, सरकार हमीभाव आणि कृषी कायदे मागे घेण्यास तयार नसल्याने ही बैठक निष्फळ ठरण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे तोडगा न निघाल्यास आंदोलनाची पुढील दिशा 1 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतरचे आंदोलन तीव्र असेल, असे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

मागे

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळांंबाबत मोठा आणि महत....

अधिक वाचा

पुढे  

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल, परेड ते कोरोना चाचणी, नेमके बदल कोणते?
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल, परेड ते कोरोना चाचणी, नेमके बदल कोणते?

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी प्रजाती समोर आली आहे. यानंतर जगभरातील सर्व....

Read more